अर्शदीप सिंह भारताचा नंबर 1 टी 20 गोलंदाज आहे. तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे, ज्याने टी 20 इंटरनॅशनलमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेतलेत. इतकच नाही, या खेळाडूने होबार्टमध्ये टीम इंडियाला जिंकवलं. प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. मग, प्रश्न हा येतो की, इतके चांगले आकडे आणि टॅलेंट असताना प्रत्येक सामन्यात त्याला संधी का मिळत नाही?. याचं उत्तर भारतीय बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कलने दिलं. मॉर्ने मॉर्कलने सांगितलं की, ‘अर्शदीप सिंह बाहेर ठेवणं ही टीम इंडियाची रणनिती आहे’
मॉर्ने मॉर्कल यांनी गुरुवारी होणाऱ्या चौथ्या टी 20 आधी मीडियाशी चर्चा केली आहे. त्यांनी पहिल्या टी 20 मध्ये अर्शदीप का खेळला नाही, त्याचं कारण सांगितलं. मॉर्कल म्हणाले की, “अर्शदीप सिंह अनुभवी गोलंदाज आहे. त्याला माहितीय आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करतो. तो एक वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे. त्याने आम्हाला पावरप्लेमध्ये बरेच विकेट मिळवून दिलेत. आम्हाला माहितीय तो टीमसाठी किती किंमती आहे. पण या दौऱ्यावर आम्हाला दुसरे कॉम्बिनेशन सुद्धा ट्राय करायचे आहेत. अर्शदीपला ही गोष्ट समजते”
टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय खेळाडूंना कठोर वाटू शकतो
मॉर्ने मॉर्कल म्हणाले की, “टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय खेळाडूंना कठोर वाटू शकतो. पण टी 20 वर्ल्ड कप आधी वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करणं गरजेच आहे. हे सोपं नाहीय. सिलेक्शवरुन निराशा होते”
अर्शदीप चौथ्या सामन्यात खेळणार का?
अर्शदीप सिंह चौथ्या टी 20 मध्ये खेळणार हे निश्चित आहे. ही मॅच टीम इंडियासाठी खूप महत्वाची आहे. कारण हरलो, तर सीरीज जिंकता येणार नाही. अर्शदीप सिंह चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्याची गोलंदाजी खेळताना संघर्ष करावा लागतोय. अर्शदीपने ऑस्ट्रेलियातील 6 सामन्यात 10 विकेट घेतलेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो मोठा विकेट टेकर असल्याच या आकड्यांवरुन स्पष्ट होतं. अर्शदीपने टी 20 इंटरनॅशनलमध्ये 66 सामन्यात 104 विकेट घेतलेत.