राष्ट्रपतींच्या छातीला स्पर्श, किस करण्याचा थेट प्रयत्न, दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार, या देशात मोठी खळबळ..
GH News November 06, 2025 02:10 PM

एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. मेक्सिकोमधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चक्क मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शेनबॉम यांच्यासोबत भर रस्त्यामध्ये हैराण करणारा प्रकार घडला. एका कार्यक्रमासाठी त्या रस्त्यावर उभ्या असताना त्यांच्या छातीला हात लावत त्यांची किस करण्याचा खळबळजनक प्रकार घडला. एका मद्यधुंद व्यक्तीने राष्ट्रपतींना मागून पकडले आणि थेट किस करण्याचा प्रयत्न केला. मेक्सिको सिटीमध्ये शीनबॉम नागरिकांना भेटत असताना ही घटना घडली. व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तो व्यक्ती राष्ट्रपतींना हात लावत किस घेत आहे.

काहीतरी चुकीचे घडत असल्याची जाणीव राष्ट्रपती क्लॉडिया शेनबॉम यांना होताच त्यांनी हात झटकला. काही सेकंदांनंतर एका सुरक्षा अधिकाऱ्याने हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की,  त्यांच्यासोबत अशी घटना ही आयुष्यात पहिल्यांदाच घडली आहे. ज्यावेळी हा व्यक्ती हे सर्व करत होता, त्यावेळी राष्ट्रपती या उपस्थित असलेल्या इतर महिलांना बोलत होत्या. त्यामुळे त्यांचे मागे काही लक्ष नव्हते.

या व्यक्तीने सुरूवातील राष्ट्रपतींच्या शरीराला स्पर्श केला. त्यानंतर तो किस घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचे हात थेट राष्ट्रपतींच्या छातीपर्यंत पोहोचले होते. यादरम्यानच राष्ट्रपतींच्या सुरक्षा अधिकाऱ्याला कळताच त्याने या व्यक्तीला सर्वात अगोदर दूर केले. मात्र, तो व्यक्ती राष्ट्रपतींच्या दूर जात नव्हता. काही वेळ यादरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

अधिक माहिती अशी की, पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. राष्ट्रपतींनी या घटनेनंतर कडक पाऊले उचलली आहेत. बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. हे फक्त माझ्यासोबत घडले नाही तर आपल्या देशात दररोज अशा घटनांना सामोरे जाणाऱ्या कित्येक महिलेसोबत हे घडते. त्यांनी पुढे म्हटले की, देशातील प्रत्येक महिलेला संदेश देण्यासाठी त्यांनी ही केस दाखल केली. कोणत्याही पुरुषाला तिच्या संमतीशिवाय स्त्रीला स्पर्श करण्याचा किंवा धरून ठेवण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.