खजुराच्या बिया आहेत Energy Booster, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत
Marathi November 08, 2025 08:25 AM

खजूर खाल्ल्यानंतर त्याच्या बिया निरूपयोगी समजून फेकून देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. साधारणपणे खजूर खाल्ल्याने होणारे फायदे सर्वांना माहिती आहेत. पण खजूर खाल्ल्यानंतर जी बी तुम्ही फेकून देता ती सुद्धा उपयुक्त आहे. बहुगुणी खजुराच्या बिया शरीराच्या अनेक समस्या दूर करू शकतात. आज आपण जाणून घेऊयात खजुराच्या बिया कोणत्या आजारावर उपयुक्त आहेत आणि त्या सेवन करण्याची पद्धत.

  • खजुराच्या बियांची पावडर पाण्यात किंवा दुधात घालून प्यायल्याने अनेक फायदे होतात. या बियांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा गुणधर्म आहे.
  • खजुराच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. याचे पावडर स्वरूपात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

हेही वाचा – सतत चिडचिड होते? असू शकते या व्हिटॅमिनची कमतरता

  • हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर खजुराच्या बियांची पावडर उपयुक्त ठरेल. या बिया कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर खजुराच्या बियांचे सेवन करावे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
  • खजुराच्या बियांची पावडर स्क्रब म्हणून वापरावी. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा चमकदार बनते.
  • केसांच्या विविध समस्या असतील तर खजुराच्या बिया उपयुक्त ठरतील. खजुराच्या बियांचे तेल केस मजबूत करण्यासाठी हे वापरता येईल.

कशी बनवाल पावडर?

  • खजुराच्या बिया चांगल्या प्रकारे धुवून त्या उन्हात वाळवाव्यात.
  • कोरड्या झाल्यानंतर त्यांना हलके भाजून घ्यावे.
  • भाजल्याने बियांमधील ओलावा पूर्णपणे निघून जाईल.
  • थंड झाल्यावर या बिया मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवावी.

हेही वाचा – Yoga VS Morning Walk: योग की चालणं? शरीरासाठी काय जास्त फायदेशीर?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.