सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहणात चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, त्यावेळी सूर्यग्रहण होते. ग्रहणादरम्यान अनेक खगोलीय घटना घडत असतात. वर्षातील एक किंवा दोन वेळा ग्रहण येते. 2025 मध्येही ग्रहण होऊन गेले. नवीन वर्षात अर्थात 2026 मध्येही फेब्रुवारी महिन्यातच सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहणाचा दिवस शास्त्रांसोबतच खगोलप्रेमींसाठी महत्वाचा असतो. सूर्याच्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. 2025 दोन सूर्यग्रहण होते. मात्र, एकही भारतात बघायला मिळाले नाही. फेब्रुवारीत 2026 मधील पहिले सूर्यग्रहण असणार आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी हे सूर्यग्रहण दिसेल. हे सूर्यग्रहण नेमके कुठे कुठे दिसणार हे जाणून घेऊयात.
कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार या दिवशी
हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असेल म्हणजेच ग्रहणाच्या वेळी सूर्याभोवती अग्नीचे वलय दिसेल. 17 फेब्रुवारी 2026 रोजी आंशिक सूर्यग्रहण दिसेल. हे अंटार्क्टिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिक, अटलांटिक आणि दक्षिण महासागरांच्या काही भागांमधून दिसेल. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये. 2025 मधीलही एकही सूर्यग्रहण भारतात दिसले नव्हते.
हे सूर्यग्रहण कुठे दिसणार जाणून घ्या
दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेचा काही भाग आणि दक्षिण हिंद महासागरातील लोक सूर्य अंशतः झाकलेला पाहू शकतील. हा एक वेगळा अनुभव असणार आहे. सूर्याचा फक्त 3 टक्के भाग काही ठिकाणी बघायला मिळेल. 2026 चे दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी होईल. म्हणजेच थोडक्यात काय तर 2025 प्रमाणेच 2026 दरम्यान देखील दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत.
दिवसा होणार पूर्णपणे काही मिनिटांसाठी अंधार
सूर्यग्रहणावेळी काही मिनिटे संपूर्ण अंधार होतो. दिवसा काही मिनिटांसाठी अंधार होण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. यादरम्यान सूर्याच्या आसपास अनेक हालचाली होतात, ज्या आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात. हे सूर्यग्रहण 2 मिनिटे 1 सेकंद चालणार आहे. दोन मिनिट दिवसा पूर्णपणे अंधार असणार आहे. हे सूर्यग्रहण 2026 मधील पहिले सूर्यग्रहण आहे. भारतात ग्रहणाला अधिक महत्व असून लोक यादरम्यान सुतक पाळतात. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये.