केंद्र सरकारच्या अनुकूल धोरणांमुळे भारतीय बँकिंग क्षेत्रावर गुंतवणुकदारांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. भारतीय बँकिंग क्षेत्र विदेशी गुंतवणूकदारांच्याही (FIIs) रडारवर आहे. सप्टेंबर 2025 च्या तिमाहीपर्यंत FIIs ने पंजाब नॅशनल बँक (PNB), एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि युनियन बँक यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे. याचदरम्यान, सरकार पीएसयू बँकांमध्ये विदेशी मालकीची मर्यादा 20 टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.
बँकिंग क्षेत्रावर FIIs चा वाढता विश्वास
भारताचे बँकिंग क्षेत्र सध्या मजबूत गतीने प्रगती करत आहे. यामध्ये 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका 21 खासगी क्षेत्रातील बँका आणि 11 स्मॉल फायनान्स बँकांचा समावेश आहे. 2024 मध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकूण मालमत्ता (Assets) 161.2 लाख कोटी रुपये होती, तर खासगी क्षेत्रातील बँकांची मालमत्ता 109.5 लाख कोटी रुपये नोंदवली गेली. एकूण बँकिंग मालमत्तेपैकी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे योगदान सुमारे 59.5 टक्के आहे.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) सप्टेंबर 2025 तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे, जो सरकारी बँकांवरील त्यांचा वाढता विश्वास दर्शवतो. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह जवळजवळ सर्व प्रमुख सरकारी बँकांमध्ये FIIs ने आपली हिस्सेदारी वाढवली आहे.
| बँक |
शेअरची सध्याची किंमत (रु) |
1 वर्षाचा परतावा |
FII हिस्सेदारी (जून 2025 ते सप्टेंबर 2025) |
| पंजाब नॅशनल बँक (PNB) |
122.45 |
18.30% वाढ |
5.52% वरून 5.67% |
| युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) |
153.30 |
30.30% वाढ |
7.7% वरून 7.86% |
| इंडियन ओवरसीज बँक (IOB) |
39.57 |
25.42% घट |
0.08% वरून 0.31% |
| स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
955.95 |
12.86% वाढ |
9.33% वरून 9.57% |
| बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) |
59.61 |
10.78% वाढ |
1.89% वरून 2.35% |
| कॅनरा बँक (Canara Bank) |
140.65 |
36.69% वाढ |
11.38% वरून 11.89% |
| बँक ऑफ बडोदा (BoB) |
289.10 |
13.08% वाढ |
8.08% वरून 8.71% |
| बँक ऑफ इंडिया (BoI) |
144.60 |
29.74% वाढ |
3.53% वरून 4.24% |
बँकांचे आर्थिक निकाल (सप्टेंबर 2025 तिमाही):
पीएनबी :
- निव्वळ व्याज उत्पन्न (NII): 10,654 कोटी रुपये (0.02% घट)
- निव्वळ नफा (Net Profit): 4,848.6 कोटी रुपये (9% वाढ).
युनियन बँक ऑफ इंडिया :
- निव्वळ व्याज उत्पन्न : 8,958 कोटी रुपये (2.3% घट),
- निव्वळ नफा: 4,281.3 कोटी रुपये (9% घट).
इंडियन ओवरसीज बँक :
- निव्वळ व्याज उत्पन्न : 3,061 कोटी रुपये (20% वाढ),
- निव्वळ नफा: 1,228 कोटी रुपये (57.5% वाढ).
एसबीआय :
- निव्वळ व्याज उत्पन्न : 50,038 कोटी रुपये (5.5% वाढ),
- निव्वळ नफा: 21,504 कोटी रुपये (6% वाढ).
बँक ऑफ महाराष्ट्र :
- निव्वळ व्याज उत्पन्न : 3,248 कोटी रुपये (16% वाढ),
- निव्वळ नफा: 1,633.5 कोटी रुपये (23% वाढ).
कॅनरा बँक:
- निव्वळ व्याज उत्पन्न : 9,659.7 कोटी रुपये (1% घट),
- निव्वळ नफा: 4,865.8 कोटी रुपये (19% वाढ).
बँक ऑफ बडोदा:
- निव्वळ व्याज उत्पन्न : 13,126 कोटी रुपये (4% वाढ),
निव्वळ नफा: 5,070.3 कोटी रुपये (7% घट).
बँक ऑफ इंडिया:
- निव्वळ व्याज उत्पन्न : 5,991.6 कोटी रुपये (1.2% घट),
- निव्वळ नफा: 2,525.6 कोटी रुपये (5% वाढ).