Girija Oak: मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सध्या मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. लवकरच तिची ‘थेरपी शेरेपी’ ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये गिरिजा ओक गोडबोलेसह गुलशन देवैया आणि नेहा धूपिया मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री गिरिजा ओक या वेब सिरीजमध्ये एक इंटीमेट सीन दिला असून तिने या सीनबद्दल एका मुलाखतीत तिचं मत व्यक्त केलं.
या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन्स करायला काहीच हरकत नाही
अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले लवकरच " ‘थेरपी शेरेपी’ " या वेब सिरीजमध्ये अभिनेता गुलशन देवैयासोबत दिसणार आहे. या चित्रपटात दोघांनी इंटिमेट सीन्स केले आहेत आणि गिरिजाने सीन्स दरम्यानचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. तिने गुलशनचे कौतुक करताना म्हटले की तो असा अभिनेता होता ज्याच्यासोबत इंटिमेट सीन्स करायला तिला कोणतीही अडचण आली नाही आणि त्याने मला खूप संभाळून घेतले होते.
Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूडतू ठीक आहेस ना?
अभिनेत्री म्हणाली, "तुम्ही कितीही तयारी केली तरी, असे फार कमी लोक असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला थोडेसेही अनकंफर्टेबल वाटत नाही आणि गुलशन त्यापैकी एक आहे." अभिनेत्री पुढे म्हणाली, "त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून तीन ते चार उशा आणल्या: एक लहान, एक मोठी, एक मऊ आणि एक थोडीशी कडक, आणि मला सर्वात चांगली वाटणारी उशी निवडण्यास सांगितले. शूटिंग दरम्यान, त्याने मला सुमारे १६-१७ वेळा विचारले, 'तू ठीक आहेस ना?'"
Wedding Special Outfit: लेहेंग्यापासून साडीपर्यंत...; लग्नसराईत या आऊटफिटमुळे मिळेल एक ग्लॅमरस लूकView this post on Instagram
"दुसऱ्या कोणासोबत..."
गिरिजा ओक पुढे म्हणाली की जेव्हा एखाद्या सीनदरम्यान उशीमुळे तिला अनकंफर्टेबल वाटायचं, तेव्हा गुलशन म्हणायचा,"जर तुम्हाला हवे असेल तर आपण काढू शकतो. मला काही अडचण नाही." "त्या हावभावामुळे मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटला. इतर कोणासोबतही हा सीन करणे कठीण झाले असते, परंतु गुलशनसोबत मी पूर्णपणे कंफर्टेबल होते. आणि आता मी त्याबद्दल उघडपणे बोलू शकते कारण त्याने मला कंफर्टेबल करण्यात खूप मदत केली. "
गिरिजा ओक गोडबोले मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘तारे जमीन पर’ (2007), ‘जवान’ (2023) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आगामी वेब सीरीज ‘थेरपी शेरेपी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही सिरिज मानसिक आरोग्य आणि नातेसंबंधांमधील अडचणींवर आधारित आहे.