या ‘7’ फळांमध्ये आहे साखरेचं जास्त प्रमाण,आहारात समाविष्ट करण्यापूर्वी हे जाणून घ्या
Marathi November 11, 2025 04:25 PM

आजकाल आरोग्य आणि फिटनेसची काळजी घेणारे लोक आपल्या आहाराबद्दल खूप सजग झाले आहेत. अनेक जण साखर टाळण्यासाठी मिठाई, चॉकलेट किंवा जंक फूडपासून दूर राहतात, पण हे फार कमी लोकांना माहित असतं की काही गोड आणि दिसायला निरोगी फळांमध्येही साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. ही फळं पौष्टिक असली तरी त्यांचे अति सेवन रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते, विशेषतः मधुमेहींसाठी किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी. (fruits with high sugar content know before you eat)

चला जाणून घेऊ या, कोणत्या 7 फळांमध्ये साखरेचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि ती कितपत प्रमाणात खाणं योग्य आहे.

1. आंबा
आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याची गोडी सगळ्यांनाच भावते. पण 100 ग्रॅम आंब्यामध्ये सुमारे 14 ते 16 ग्रॅम साखर असते. त्यामुळे आंबा खाणं आरोग्यदायी असलं तरी, मधुमेहींनी किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी त्याचं प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे.

2. द्राक्षे
लहान दिसणाऱ्या द्राक्षांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. 100 ग्रॅम द्राक्षांमध्ये 15 ते 16 ग्रॅम साखर असते. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के असतं, पण त्याचं अति सेवन केल्यास साखर झपाट्याने वाढू शकते.

3. लिची
उन्हाळ्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेली लीची चवीला अप्रतिम असली तरी 100 ग्रॅम लीचीमध्ये सुमारे 15 ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेहींनी हे फळ मोजूनच खावं.

4. केळी
ऊर्जा देणारं आणि पोट भरणारं फळ म्हणजे केळं. पण एका मध्यम आकाराच्या केळ्यात सुमारे 12 ते 14 ग्रॅम साखर असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये केळी मर्यादित प्रमाणातच घ्यावीत.

5. अननस
गोड आणि आंबट चवीमुळे अननस सर्वांनाच आवडतं. पण 100 ग्रॅम अननसात सुमारे 10 ते 13 ग्रॅम साखर असते. विशेषत: अननसाचा रस घेतल्यास साखर झपाट्याने वाढू शकते, त्यामुळे रसाऐवजी ताजं अननस खाणं योग्य.

6. चेरी
चेरी दिसायलाही सुंदर आणि खायलाही गोड असतात. 100 ग्रॅम चेरीमध्ये 13 ग्रॅम साखर असते. चेरी आरोग्यदायी असली तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते.

7. अंजीर
ताजं आणि वाळलेलं अंजीर दोन्ही पौष्टिक असतात, पण त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. 100 ग्रॅम अंजीरमध्ये 16 ते 17 ग्रॅम साखर असते. वाळलेल्या अंजीरमध्ये तर हे प्रमाण अधिकच असतं.

ही सर्व फळं शरीरासाठी फायदेशीर आहेत, पण त्याचं प्रमाण ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे. मधुमेहींनी ही फळं खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(अस्वीकरण: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.