सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बालसोबत लग्न केल्याने दोन्ही भाऊ नाराज? अखेर सत्य पुढे, मावस बहीण म्हणाली…
Tv9 Marathi November 11, 2025 04:45 PM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षीने काही वर्षे डेट केल्यानंतर जहीर इक्बालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडाली. सोनाक्षी हिने अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये जहीर इक्बालसोबत सिव्हिल मॅरेज अगोदर केले आणि त्यानंतर धमाकेदार पार्टी केली. या पार्टीला जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. सोनाक्षी सिव्हिल मॅरेजवेळी सही करत होती, त्यावेळी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई शेजारी उभे होते. सोनाक्षीच्या लग्नाला 16 महिने पूर्ण झाली आहेत. पती जहीर इक्बाल याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती कायमच शेअर करताना दिसते. सध्या सोनाक्षी तिच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.

सोनाक्षी सिन्हा स्वत:च्याच लग्नात धमाल करताना दिसली. सोनाक्षीच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ उपस्थित नसल्याने विविध चर्चा रंगताना दिसल्या. हेच नाही तर तिच्या दोन्ही भावांचा या लग्नाला विरोध असल्याचे सांगितले जाते. आता यावर सोनाक्षीच्या मावस बहिणीने मोठा खुलासा केला. खरोखरच सोनाक्षीने जहीरसोबतलग्न केल्याने तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश नाराज होते का? यावर भाष्य केले.

पूजा रूपारेल ही सोनाक्षीची सख्खी मावस बहीण आहे. विशेष म्हणजे तिने काही चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, त्यानंतर तिच्या आयुष्यात मोठी अनेक संकटे आली. तिला म्हणावे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही. अगदी कमी वयात तिचे वडील गेले आणि त्यानंतर तिच्या आईचेही निधन झाले.पूजा रूपारेलची आई आणि सोनाक्षीची आई दोघे बहिणी होत्या. पूजा रूपारेलच्या आईच्या निधनानंतर मावणी पूनम सिन्हा हिने मुलीसारखे प्रेम पूजाला दिले.

सोनाक्षी सिन्हाच्या बहिणीने नुकताच एक मुलाखत दिली. यादरम्यान तिला सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात लव आणि कुश खरोखरच नाराज होते का? यावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर पूजाने भाष्य केले. पूजा म्हणाली की,
मी गॉसिप करायला आलेली नाही. मी जहीरला भेटले आहे, तो मला भेटलेल्यांपैकी सर्वात मजेदार माणूस नक्कीच आहे. लव आणि सोनाक्षीने निकिता रॉय नावाच्या एका संपूर्ण चित्रपटात एकत्र काम केले. जर खरोखरच यांच्यामध्ये काही असते तर दोघांनी एकत्र काम केले असते का? ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले, असेही तिने म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.