प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या लेकींसाठी 11 लाखांची मदत जाहीर केली आहे.
‘देऊळबंद 2’ चे शूटिंग थांबवून मदत निधीची घोषणा केली आहे.
‘देऊळबंद 2’ चित्रपटाची टीम शिर्डी येथे साई बाबांच्या चरणी आली होती.
सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी
दिग्दर्शकप्रवीण तरडे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या लेकींसाठी मोठी मदत केलीय. चित्रपटाचं शूटिंग थांबवून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी ११ लाखांची मदत केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देऊळबंद 2 चित्रपटाच्या टीमसह शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. ‘देऊळबंद 2’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग थांबवून प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी तब्बल 11 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यालेकींसाठी प्रवीण तरडे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करत त्यांनी असलेल्या समाजाविषयीची आपुलकी दाखवलीय. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर प्रवीण तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.. यावेळी मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी 11 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
Bollywood Famous Actor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे तरुण अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध; पत्नीने केली हेरगिरी, गुप्तहेराचा खुलासानुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुठल्याच मुलीचं शिक्षण बंद पडू देणार नाही. चित्रपटाचंशूटिंगनंतर करू, पण आधी मुलींना शिक्षणासाठी मदत करणार आहोत. शेती विकायची नसते, शेती राखायची असते. आम्ही करत असलेली मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी प्रतिक्रिया तरडे यांनी दिली आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार होता.
Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?मात्र त्यांनी आता चित्रपटाचे शूटिंग थांबवलंय. चित्रपटाचे शूटिंग थांबून सगळे कलाकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरलेत. 'देऊळ बंद 2'च्या टीमकडून 11 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे पत्रकार संघ आणि शिवार हेल्पलाइनच्या मदतीने पूरग्रस्त भागात गरजू लोकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहचवली जाणार आहे.
देऊळ बंद सिनेमाच्या पहिल्या भागात अभिनेता गष्मीर महाजनी, मोहन जोशी, निवेदिता सराफ हे कलाकार होते. यामध्ये गष्मीर महाजनी हा वैज्ञानिक होता, जो स्वामींचं मंदिर बंद करतो. मोहन जोशी यांनी या सिनेमात स्वामींची भूमिका साकारली होती. देऊळ बंद 2 मध्येही जास्त भीषण वास्तव असेन. मागच्या भागात देवाला वैज्ञानिक भेटला होता. आता या भागात स्वामींना शेतकरी भेटणार असं प्रवीण तरडे देऊळ बंद 2 ची घोषणा करताना म्हणाले होते.