Delhi Blast: दिल्लीतील रेडिसन हॉटेलजवळ पुन्हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. रेडिसन हॉटेल परिसरात मोठा आवाज झाल्याचा कॉल पोलिसांना आला होता. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिल्लीत सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा मोठे आवाज ऐकायला आल्याचं समोर येताच खळबळ उडाली होती. पण पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. महिपालपूर परिसरातून ९.२० च्या सुमारास पोलिसांना एका महिलेनं कॉल केला होता. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.
दिल्ली पोलिसांकडून घटनास्थळी काही संशयास्पद सापडलं नसल्याचं स्पष्ट केलंय. स्फोटाच्या आवाजाचा दावा कॉल करणाऱ्या महिलेनं केला होता. रॅडिसन हॉटेल परिसरातून महिलेनं पोलीस आणि अग्निशमन दलाला कॉल करून याची माहिती दिली होती. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पण तपास केला असता तिथं काही संशयास्पद सापडलं नाही. आता कॉल करणाऱ्या महिलेचा शोध घेतला जात आहे.
Delhi Red Fort Blast : मराठमोळ्या अधिकार्याच्या हाती देशाचा विश्वास! लाल किल्ला स्फोटाचा तपास नागपूरकर विजय साखरेंकडे!पोलिसांनी या प्रकरणी परिसरातही शोधमोहिम राबवली आणि तपास केला. तेव्हा अशी माहिती समोर आली की, जवळच एका बसचा टायर फुटला. टायर फुटल्यानं मोठा आवाज झाला तो स्फोटासारखा वाटल्यानं महिलेनं कॉल केला. सोमवारी झालेल्या कार स्फोटाच्या घटनेनंतर भीतीमुळे महिलेनं हा कॉल केल्याचं सांगण्यात येत आहे.