Shubman Gill : मोहम्मद शमीचं टीम इंडियात सिलेक्शन का नाही? शुबमन गिलने 2 नावं घेऊन दिलं उत्तर
Tv9 Marathi November 13, 2025 08:45 PM

India vs South Africa Test : कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर येत्या 14 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. कोलकाता येथे सहावर्षानंतर टेस्ट मॅच होत आहे. 2019 साली इथे शेवटचा कसोटी सामना झाला. त्या टेस्टमधले बहुतांश खेळाडू आता खेळताना दिसणार नाहीत. यात एक आहे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. ईडन गार्डन्स हे शमीच घरचं मैदान आहे. सिलेक्टर्सनी या सीरीजसाठी शमीची निवड केलेली नाही. त्यावरुन वाद झाला. यावर अनेकांनी आपलं मत मांडलय. कॅप्टन शुबमन गिलने यावर उत्तर दिलं.तो शमीच्या क्षमतेबद्दल बोलला.

कोलकाता येथे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टेस्ट मॅच आधी 13 नोव्हेंबरला गिलने प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यात एक प्रश्न शमीला निवडलं नाही, त्या बद्दल होता. त्यावर गिलनेस्पष्टपणे सांगितलं की, ‘सिलेक्शनच्या मुद्यावर तो काही बोलणार नाही. सिलेक्टर्स याचं तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकतील’

शुबमन गिल काय म्हणाला?

शुबमन गिल 6 महिन्यापूर्वीच टीमचा कॅप्टन बनलाय. त्यामुळे तो या मुद्यावर जाहीरपणे काही बोलणार नाही. आधीचे कॅप्टन सुद्धा असेच करायचे. शुबमन गिलने मोहम्मद शमीच कौतुक केलं. शमीसाठी हे कठीण असल्याच तो बोलला. “त्याच्या क्वालिटीचे जास्त गोलंदाज नाहीयत. पण तुम्ही आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा या विद्यमान गोलंदाजांच्या प्रदर्शनाकडे दुर्लक्ष करु शकत नाही. कधी-कधी शमी सारख्या खेळाडूंसाठी बाहेर बसणं कठीण असू शकतं” असं शुबमन गिल म्हणाला.

शमीच्या निवडीवर चीफ सिलेक्टर काय म्हणालेले?

मोहम्मद शमी शेवटचं 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळला होता. वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये त्याला दुखापत झाली, तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या टीममध्ये तो होता. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली. पण त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करुनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यावर शमीने प्रश्न उपस्थित केले. “मी फक्त मेहनत करु शकतो, असं तो म्हणाला. त्यावर चीफ सिलेक्टर अजित आगरकर म्हणालेले की, शमीला मला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टूरसाठी निवडायचं होतं. पण तो फिट नव्हता. अजूनही तो पूर्णपणे फिट वाटत नाही”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.