राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठण्यात आली होती. या नोटीसला रुपाली ठोंबरे पाटील यांनी उत्तर दिले आहे. मी कुठेही पक्षशिस्तीचा भंग केलेला नाही. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नाही, हे माझे मत मी मांडले होते. मला पक्षाने खुलासा पत्र मागितलं होते. राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल काल मी खुलासा दिला आहे. मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेले नाही. मला पक्षाकडून नोटीस का देण्यात आली, मला याची कल्पना नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Pimpri Chinchwad : पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा उघडकीसताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जागेची परस्पर विक्री कोट्यावधी रुपयात करण्यात आली आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची विक्री परस्पर केली आहे. पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून जागेची विक्री करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून याबाबतची माहिती जेव्हा पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी या विषयाची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्ताकडे केली आहे. आता या प्रकरणात पुण्याचे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू आहे.
ऑल इंडिया मजलीस इत्तेहाद उल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम हा पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. तशी घोषणाच एमआयएमचे मुंबईचे अध्यक्ष फरुख मक्बुल शब्दी यांनी केली आहे. त्यांच्या माहितीनुसार एमआयएम कमीत कमी 50 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. मुंबई महापालिकेसाठी नुकतेच आरक्षण सोडत जाहीर झाली. एससी, एसटी, ओबीसी पवर्गांसाठी काही प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. तरीदेखील आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत
Ambadas Danve : पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते..शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी-विक्री पकरणावरून अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असा दावा दानवे यांनी केला. पार्थ पवार यांच्या कथित जमीन प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादामुळे अजित पवार कमालीचे संतप्त झाले होते. ते रागाच्या भरात उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते, सरकारला बाहेरून पाठिंबा कायम ठेवण्याची त्यांची भूमिका होती, असेही दानवे म्हणाले.
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेला डोनाल्ड ट्रम्पसोबत पाठवलं तरी मला हरकत नाही..राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक बनविण्यात आलंय. त्यासंदर्भाने मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता, धनंजय मुंडेला डोनाल्ड ट्रम्पसोबत पाठवलं तरी मला हरकत नाही. मात्र, त्याला आधी तपासणीसाठी पाठवावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, अजितदादा तुमच्या मुलावर घातपात केला असता तर तुम्ही गप्प बसले असते का? त्यामुळे का पांघरूण घालता असा सवालही अजित पवार यांना विचारला आहे.
BJP: राजू शिंदे पुन्हा भाजपात घरवापसी करणार! संभाजीनगरमध्ये हालचाली सुरूमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवत एक लाखाहून अधिक मतं घेणारे राजू शिंदे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या १६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या नव्या कार्यालयच उद्घाटन कार्यक्रमातच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते.
Amol Mitkari : अमोल मिटकरींचे प्रवक्ते पद गेले, पण अजित पवारांनी सोपवली महत्वाची जबाबदारीतीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या आमदार अमोल मिटकरी यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर क्षाकडून स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवाजी पार्क, शिवसेना भवन परिसरात ठाकरे बंधू यांचे एकत्रित बॅनर लावण्यात आले होते. 'ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक' असा आशय बॅनरवर पाहायला मिळत होता. कुर्ला येथील मनसैनिक लक्की वामन कर्डक यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवरील आशय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आवडली नाही, त्यामुळे हे बॅनर त्वरित काढून टाकावे अशा सुचना मनसे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर, किल्लेदार यांनी त्वरित हे बॅनर काढून टाकले आहेत. दरम्यान, या बॅनरवरील ठाकरेंचा सेवक.. या शब्दाला आक्षेप घेत हे बॅनर उतरवण्यात आले आहेत.
नाशिकच्या रामकुंड परिसरात फडणवीसांकडून पाहणीआगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील रामकुंड परिसराला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान, 'भाविकांची गैरसोय होऊ नये त्याच सोबत भाविकांना सुविधा प्राप्त व्हाव्यात' या उद्देशाने नियोजनाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पांची माहिती घेतली आणि कुंभमेळ्याच्या वेळी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण २०२७ मध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचे नाशिकमध्ये आगमनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वागत केले.
यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी उपस्थित होते.
कॉंग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल भाजपमध्येमाजी आमदार व कॉंग्रसचे नाशिक जिल्हाध्यक्ष राहिलेले शिरीषकुमार कोतवाल यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरनाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यात रामकुंड पंचवटी, नाशिक येथे रामकाल पथ पाहणी, जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा मुख्य सोहळा ठक्कर मैदान, त्र्यंबक रोड, नाशिक येथे होणार आहे.
काँग्रसचे वंचितसोबत युतीचे संकेतवंचित बहुजन आघाडी सोबत स्थानिक पातळीवर युती करण्याचे संकेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ते म्हणाले. काही ठिकाणी आम्ही वंचितसोबत युती करत आहोत. काही ठिकाणी बसपाला सोबत घेत आहोत.
ट्रम्पेट वगळले, रोहित पवारांनी मानले निवडणूक आयोगाचे आभारनिवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं...! पण असो! देर आए दुरुस्त आए..!
महायुतीमधील कोणत्याही पक्षासोबत युती नाही - विजय वडेट्टीवारराज्यात नगरपरिषद, नगरपालिका निवडणुका होत आहेत. याबाबत तिकीट, उमेदवार अंतिम करण्यासाठी बैठक झाली. राज्यात महायुती मधील कोणत्याही घटक पक्षाशी आम्ही युती करणार नाही. काही जिल्ह्यात वंचित बरोबर देखील आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. बीएसपी बरोबर देखील जाण्याची तयारी आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
एमसीएच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाडमुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती, शरद पवार-अशिष शेलार गटाने या निवडणुकीसाठी युती केली होती.
शेतीच्या प्रश्नामुळे मुली भेटत नाहीत - अनिल देशमुखलग्न जुळवून द्या, असे पत्र एका तरुणाने शरद पवारांनी दिले आहे. त्याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले, अनेक गावांमध्ये तरुण राहतात. बेरोजगारी असल्याने मुलींना शहरातील नवरा पाहिजे, असे मानसिकता आहे. ही सामाजिक समस्या आहे.
निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या जिल्हा दरसूचीच्या दर निश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक खर्चाच्या वापरण्यात आलेली दरसूची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकात वापरण्यास सहमती दर्शविण्यात आली.
Pune News: पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून 2 तरुणींवर अत्याचारपुण्यातून तीन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लग्नाचं आमिष दाखवून दोन तरुणी आणि एका महिलेवर बलात्कार केल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत. कोंढवा, हडपसर आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी केवळ सहा अर्ज दाखलजळगाव पालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बुधवारी तिसऱ्या दिवशी सहा अर्ज दाखल झाले आहेत. ऑनलाइन ११५ अर्ज आले आहेत. अमळनेरला पाच तर पाचोरा येथे एक अर्ज असे एकूण सहा अर्ज ऑफलाइन दाखल झाले आहेत. मंगळवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी वरणगाव येथे एक अर्ज दाखल झाला. तर नगरसेवक पदासाठी भुसावळ, अमळनेर, पाचोरा येथे प्रत्येक एक अर्ज दाखल झाले होते.
दिल्ली स्फोटात दहशतवादी डॉक्टर उमरचा मृत्यूदिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉक्टर उमरचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. कारमध्ये स्फोट झाला तेव्हा उमर त्याच कारमध्ये होता असे तपासात स्पष्ट झाले आहे. डीएनए चाचणीमधून उमरच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती आज पक्षाचे अध्यक्ष अजित पवार घेणार आहेत. त्यासाठी ते बारामतीत दाखल झाले आहेत.