'तारे जमीन पर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या नॅशनल क्रश बनली आहे. तिच्या निळ्या साडीतल्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तिने नुकतीच एका चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यातील तिचा लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले. तिच्या साधेपणातील सौंदर्य चाहत्यांना भावलं. त्यानंतर ती रातोरात नॅशनल क्रश बनलीय. तिची तुलना थेट दाक्षिणात्य अभिनेत्रीन्सोब्त केली जातेय. मात्र सगळ्यांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी गिरीजा किती वर्षांची आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
गिरिजाने एका मुलाखतीसाठी हा खास लूक केला होता. निळी साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केला होता. तिचे मोकळे केस आणि मिनिमल मेकअप यामुळे तिच्यावर चाहते फिदा झालेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. मात्र गिरीजाचं वय किती आहे माहितीये का? गिरीजा ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गिरिष ओक यांची मुलगी आहे. गिरिजा ही ३७ वर्षांची आहे. गिरिजाने २०११ साली सुहृद गोडबोले यांच्याशी लग्न करत संसार थाटला. तिला एक मुलगादेखील आहे.
GIRIJA OAK
गिरीजा खरं तर मराठी, हिंदी आणि कन्नड प्रॉजेक्ट्समध्ये दिसली आहे. तिने बॉलिवूडचे हिट चित्रपट 'तारे जमीन पर' (2007) आणि 'शोर इन द सिटी' (2010) या व्यतिरिक्त 'जवान' (2023) मध्येही खास भूमिका साकारली आहे. याशिवाय, गिरीजा ओकने नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'इंस्पेक्टर जेंडे' या चित्रपटातही काम केले आहे. यामध्ये तिने मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
View this post on InstagramA post shared by Vishal sinha (@vishalsinhadop)
गिरीजा ओकने मुंबईतील कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी मिळवली. अभिनयाच्या क्षेत्रात पूर्णपणे प्रवेश करण्यापूर्वी तिने बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यासही केला आणि थिएटर वर्कशॉपमध्येही सहभाग घेतला होता. ती अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे.
सावत्र आई हेमा मालिनी यांना काय हाक मारतात सनी आणि बॉबी देओल? ड्रीम गर्लने स्वतः दिलेलं उत्तर; म्हणालेली-