संघाच्या शाहिरी दिनदर्शिकेचे प्रकाशन
esakal November 14, 2025 01:45 AM

पुणे, ता. १२ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्यातर्फे साकारण्यात आलेल्या ‘शाहिरी दिनदर्शिके’चे प्रकाशन नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात नुकतेच झाले.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा समितीतर्फे निर्मित या विशेष दिनदर्शिकेमध्ये १२ दिवंगत ज्येष्ठ शाहिरांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रकाशन समारंभाला शाहीर हेमंतराजे मावळे, संस्कार भारतीचे अध्यक्ष मैसूर मंजुनाथ, उपाध्यक्ष हेमलता मोहन, नीलांजना रॉय, केंद्रीय महामंत्री अश्विन दळवी, ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार, केंद्रीय प्रतिनिधी सतीश कुलकर्णी, संघटन मंत्री अभिजित गोखले, ज्येष्ठ गायक मुकुंद मराठे, पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.