लोगो -
समस्यांच्या गर्तेतील पशुवैद्यकीय दवाखाने
जिल्ह्यातील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखाने विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. आवश्यक तसेच अपुऱ्या सुविधांमुळे पशुपालकांची गैरसोय होत असून, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपयुक्त सुविधा मिळाल्यास वेळेची व पैशांची बचत होईल. अस्मानी संकटाने मेटाकुटीला शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सद्यःस्थितीचा घेतलेला आढावा...