तानाजी सावंत यांच्या भावाचा भाजप प्रवेश रखडला; कौटुंबिक की राजकीय मतभेद? नेमकं कारण काय?
Saam TV November 14, 2025 05:45 AM
  • शिवाजी सावंत यांचा भाजप पक्ष प्रवेश रखडला

  • सावंत यांच्यासोबत माजी नगरसेवकांचाही होणार होता पक्षप्रवेश

  • पक्षप्रवेश लांबणीवर

  • राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि सोलापुरातील माजी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये होणारा पक्षप्रवेश रखडणार आहे. सावंत यांचा भाजपमध्ये होणारा अपेक्षित पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. माजी मंत्री आणि भूम परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत हे शिवाजी सावंत यांचे बंधू आहेत. बुधवारी त्यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार होता. मात्र, अद्याप हा पक्ष प्रवेश सोहळा झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून माजी मंत्री तानाजी सावंतआणि शिवाजी सावंत यांच्यात कौटुंबिक तसेच राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. या मतभेदानंतर शिवाजी सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी सावंत हे भाजपपक्षातील नेत्यांच्या संपर्कात होते. अलिकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. बुधवारी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबईत होणार होता. यासाठी सावंत यांनी सर्व तयारीही केली होती.

अजित पवार गटाकडून काँग्रेसला जबरी धक्का; ज्येष्ठ नेत्याचा रामराम, ४० वर्षांची सोडली साथ

शिवाजी सावंत यांच्यासोबत कुर्डूवाडी, करमाळा आणि सोलापुरातील अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार होता, अशी माहिती आहे. मात्र, अंतिमक्षणी हा पक्षप्रवेश सोहळा लांबणीवर पडला. या घडामोडींमुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवादी सावंत यांचा भाजप पक्षात प्रवेश कधी होणार? असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.