पिंपरी, ता. १४ ः आराध्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड स्टेशन या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस समितीचा अनुसूचित जाती विभाग आणि मातंग एकता आंदोलन या महाराष्ट्र संघटनेतर्फे लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धकृती पुतळ्याला आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लहुजींच्या जयंतीनिमित्त त्यांची स्फूर्ती देणारी शाहिरी गाणी जलसा गायक बापू पवार यांनी सादर केली.
-----