राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणूकांसाठी उमेदवारांचे नामांकन भरण्याची तारीख १० ते १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. २ डिसेंबरला निवडणूक तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्या करण्याची तयार विविध पक्षात सुरु आहे. या दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोकणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नारायण राणे यांना शह देण्यासाठी तेथे दोन्ही शिवसेना एकत्र येणार का ? याकडे लक्ष लागले असता उद्धव ठाकरे गटाचे माहिती संपर्क प्रमुखांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूकांचे वातावरण तापले आहे. राज्यात एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र येणार का ? याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजप सोडून कोणाशीही युती होऊ शकते अशी घोषणा केल्या शरद पवार आणि अजित पवार या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या निमित्ताने एकत्र येणार का ? याकडे लक्ष लागले आहे. त्यातच कोकणात उद्धव ठाकरे यांची सेना आणि एकनाथ शिंदे यांची सेना एकत्र येणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
त्यातच आता पंढरपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने AB फार्मचे वाटप सुरु केले आहे. यावेळी उबाठाचे माहिती संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांनी महत्वाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांना त्रास देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राज्यात कोठेही युती करायची नाही असा निर्णय झाला असल्याची माहिती अनिल कोकिळ यांनी दिली आहे.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना त्रास देणाऱ्या …उद्धव ठाकरे यांना त्रास देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राज्यात कोठेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत युती करायची नाही असा निर्णय झाला असल्याची माहिती संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांनी दिली आहे. पंढरपुरात उबाठा गटा कडून AB फार्मचे वाटप सुरु आहे. 18 प्रभागातील 36 नगरसेवकांना शिवसेना उबाठा गटाने ए बी फॉर्मचे वाटप केले आहे.
कुर्डूवाडी नगरपालिकेत शिवसेना उबाठा गटाला रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत युती झाली आहे. कुर्डूवाडी येथे आघाडीत झालेल्या बिघाडीच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शिवसेना उबाठा गटाने पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत 18 प्रभागातील 36 उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले आहे.
येत्या 17 तारखेला उबाठा गट, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे अशा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक होणार आहे. बैठकीत जागा वाटपावरून काही वेगळा निर्णय झाला तर दक्षता म्हणून सर्वच प्रभागातील उमेदवारांना एबी फार्मचे वाटप केले असल्याची माहिती शिवसेना उबाठा गटाचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी दिली आहे.