आजकाल नवीन बांधलेल्या इमारती असो किंवा बहुकेतदा जुन्या इमारतींमध्येही, अपार्टमेंटमध्ये लिफ्ट या असतातच. ज्या उंच इमारतींमध्ये तर लिफ्टशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे आता अगदी 5 ते 7 माळ्यांच्या अपार्टमेंटमध्ये देखील येजा करण्यासाठी लिफ्टची सोय असतेच. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की आपल्याला रोजच्या वापरात असणारी किंवा आपलं येण-जाणं सोयीचं करणारी ही लिफ्ट अडचणीतही आणू शकते. होय,फेंगशुईनुसार लिफ्ट असलेली जागा घरासाठी चुकीची ठरू शकते. कशी ते जाणून घेऊयात.
फेंगशुईनुसार, तसेच वास्तूशास्त्रानुसारलिफ्ट कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर नसावी. ते अशुभ मानले जाते. त्यामुळे घर खरेदी करताना याचा नक्कीच विचार करावा. पण लिफ्ट घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर का नसावी यामागे बरीच कारणे आहेत. ती कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात.
दारासमोर लिफ्ट का नसावी?
फेंगशुईनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही लिफ्ट असू नये, कारण यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा घरमालकाच्या, घरप्रमुखाच्या नशिबावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. हे अपरिहार्य आहे, कारण एका मजल्यावर सामान्यतः एक किंवा अधिक फ्लॅट असतात. एखाद्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लिफ्ट असणे अनिवार्य असतेचय पण त्यासाठी घर खरेदी करताना शक्यतो असे लिफ्ट अगदीच समोर आहे असे फ्लॅट घेणे टाळावे.
मुख्य दरवाजासाठी फेंगशुई टिप्स
फेंगशुईनुसार, जर घराच्या दारासमोर लिफ्ट येत असेल तर ते अशुभ मानलं जातं. पण जर ही परिस्थिती टाळणे शक्य नसेल तर काय करता येईल हे देखील जाणून घेऊयात. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे मुख्य दरवाजाच्या वर अष्टकोनी आरसा ठेवल्याने समस्या येणार नाहीत. लिफ्टमधून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कोणतीही नकारात्मक ऊर्जा त्या आरशामुळे घरापर्यंत येणार नाही. कारण काच नकारात्मक ऊर्जा लगेच आकर्षित करते. त्यामुळे अनेकदा अचानक काच फुलट्याच्या घटना घडतात. याचा अर्थ त्या काचेने ती नकारात्मकता घेतल्याने ती फुटते आणि आपलं संरक्षण होतं.
दारासमोर लिफ्ट असल्यास काय उपाय करावे?
हा आरसा दरवाजाच्या बाहेरील बाजूस असणे महत्वाचे आहे. घराबाहेर हिरवीगार झाडे देखील लावता येतात, ज्यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. याव्यतिरिक्त, मुख्य दरवाजासमोरील जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवावी. लिफ्टमुळे, बरेच लोक मुख्य दरवाजाजवळून जातात, ज्यामुळे प्रत्येकाच्या उर्जेचा परिणाम होतो. म्हणून, हे उपाय अंमलात आणणे अत्यंत महत्वाचे आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)