बिहारच्या निवडणूकीत नितीश कुमार यांच्या मदतीने एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. यामुळे अलिकडच्या काळात बिहार धरुन भाजपाला सहा राज्यात विजय मिळाला आहे. भाजपा प्रणित एनडीएने बिहारात महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पराभव केला आहे. आता भाजपानचे पुढचे टार्गेट काय असणार याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे भाकित केले आहेत.
बिहारात भाजपा प्रणित एनडीएला मोठा विजय मिळला आहे. काँग्रेसचा आणि इतर विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या दिल्ली कार्यालयात रात्री विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या संबोधनात बिहारच्या जनतेला आता जंगल राज नको तर विकास हवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आजचा आपला विजय नव्या प्रवासाची सुरुवात आहे. बिहारने जो विश्वास टाकला, त्यामुळे आमच्या खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे असे मोदी यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षात बिहार अधिक वेगाने पुढे जाईल. बिहारमध्ये नवे उद्योग येतील. बिहारच्या तरुणांना बिहारमध्येच रोजगार मिळेल यासाठी आम्ही काम करू. बिहारमध्ये गुंतवणूक येईल. त्यातून अधिक नोकऱ्या मिळेल. बिहारमध्ये पर्यटनाचा विस्तार होईल. जगाला बिहारचं नवे सामर्थ्य दिसेल असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
बिहारमध्ये तिर्थस्थानांचा कायापालट होईल. मी आज देश आणि जगातील गुंतवणूकदारांना सांगतो, बिहार तुमच्या स्वागतासाठी तयार आहे.मी देश आणि जगात असलेल्या बिहारच्या मुलांना सांगतो बिहारमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वात चांगली वेळ आहे असे यावेळी मोदी म्हणाले.
भाजपची ताकद ही भाजपचा कार्यकर्ताबिहारच्या माता, भगिनी, शेतकऱ्यांना सांगतो, तुमचा विश्वास हे माझं जुनं नातं आहे. तुमची आशा आकांक्षा ही माझी प्रेरणा आहे. आपण मिळून एक असा बिहार बनवूया जो समृद्ध आणि विकसित असेल. भाजपची ताकद ही भाजपचा कार्यकर्ता आहे. जेव्हा भाजपचा कर्मठ कार्यकर्ता जेव्हा ठरवतो तेव्हा कोणतंच लक्ष्य अशक्य होत नाही असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
जंगलराज उखडून फेकेलमोदी पुढे म्हणाले की भारताच्या यशाचा आधारभाजपचा कार्यकर्ताच आहे. आजच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांना केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगाल ओरिसात ही नव्या ऊर्जेने भारावून टाकलं आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.