Rashmika Mandanna Love Confession : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगताना पहायला मिळताय. गेल्या महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्या असल्याचं बोललं जातय. तसंच 23 फ्रेबुवारीला ते लग्न करणार असल्याचं सुद्धा म्हटलं जातय. उदयपूरमध्ये ते डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा नेटकऱ्यांनेमध्ये रंगली आहे.
या सगळ्यात रश्मिका आणि विजय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विजयने सगळ्यासमोर रश्मिकाच्या हातावर किस केलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. दरम्यान सध्या एक व्हिडिओ चर्चेत आलाय. त्यामध्ये रश्मिकाने सगळ्यासमोर विजयचं तोंडभरून कौतूक केलय. तसंच प्रत्येकाच्या आयुष्यात विजय सारखा मुलगा यावा असं ती म्हणाली.
हैदराबादमध्ये 'द गर्लफ्रेंड' या सिनेमाच्या सक्सेस पार्टीत रश्मिकाने तिच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना तिने विजय देवरकोंडाचं तोंडभरून कौतूक केलं. तिने सगळ्यासमोर विजयवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. तसंच यावेळी तिने सगळ्यांच्या आयुष्यात विजय सारखा मुलगा यावा अशी आशा व्यक्त केली. सध्या तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on InstagramA post shared by SIIMA (@siimawards)
रश्मिका म्हणाली की, 'विजू... तु सुरवातीपासूनच या सिनेमाचाभाग होतास. या सिनेमाच्या यशामध्ये तुझा सुद्धा वाटा आहे. व्यक्तिगत रुपात तु नेहमीच माझ्या सोबत होता. मी आशा करते की, प्रत्येकाच्या आयुष्यात विजय देवरकोंडा असावा. कारण तो एक आशीर्वाद आहे.' तिचं हे वाक्य ऐकताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत एकच जल्लोष साजरा केला.
दरम्यान विजयने सुद्धा रश्मिकाबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलय. तो बोलताना म्हणाला की, 'तु एक अशी मुलगी आहेस जी प्रत्येक पात्र साकारू शकते. प्रत्येक पात्राला ती आधी समजून घेऊन वेळ देते. ती असा विचार कधीच करत नाही की, हा सिनेमा लोकांना आवडेल, किंवा ते सिनेमा पाहण्यासाठी येतील.'
'अरे ही तर खडूस म्हातारी' जया बच्चन यांना नक्की काय झालंय? पापारझींवर पुन्हा भडकल्या, म्हणाल्या...'तोंड बंद ठेवा आणि...'