तुम्ही लहान मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात, प्रवास होईल आनंददायी
Tv9 Marathi November 15, 2025 07:45 PM

लहान मुलासोबत प्रवास करणे हा खरोखरच एक खास अनुभव असू शकतो. जेव्हा तुम्ही मुलांना लागणाऱ्या गोष्टी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पूर्ण तयारी करून जर फिरायला जाण्याचा प्लॅन केला तर तुमचा प्रवास खूप आनंददायी होऊ शकतो. कारण मुलांच्या गरजा आणि त्यांचे मूड अचानक बदलू शकतात आणि जर तुम्ही कोणतीच तयारी न करता फिरायला गेलात तर मुलांसोबत तुमचाही प्रवास कंटाळवाणा आणि तणावपूर्ण होऊ शकतो.

यासाठीच नियोजन करण्यापासून ते सामान पॅक करण्यापर्यंत, प्रवासाच्या पद्धतीपर्यंत, निर्णय घेताना तुमच्या मुलांना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर आजच्या लेखात आपण लहान मुलासोबत प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळे तुमचा प्रवास सोपा, सुरक्षित आणि आनंददायी होईल. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.

मुलांसोबत प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

योग्य प्रवास वेळ निवडा – तुम्ही फिरायला जाण्याचे प्लॅन करताना तुमच्या बाळाची झोप, भूक आणि हालचालींचा वेळ विचारात घ्या. यामुळे तुमचे बाळ पुर्ण प्रवासात अधिक आरामदायी आणि शांत राहील.

मूलभूत गरजेच्या वस्तू आधीच तयार ठेवा – तुमच्या बॅगेत नेहमी डायपर, बेबी वाइप्स, दुधाची बाटली, सिपर, बाळाचे अन्न, अतिरिक्त कपडे आणि काही बाळाची औषधे ठेवा.

नेहमी सोबत वैद्यकीय किट ठेवा – ताप, पोटदुखी, उलट्या किंवा ॲलर्जीसारख्या समस्यांसाठी, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे पॅक करा.

आरामदायी कपडे निवडा – हवामानानुसार तुमच्या मुलांना खूप गरम ही जाणवलं नाही पाहिजे किंवा खूप थंडही नाही असे कपडे घाला. म्हणून प्रवासात हलके आणि थोडे उबदार कपडे सोबत ठेवा.

तुमच्या मुलाची आवडती खेळणी आणि पुस्तके तुमच्यासोबत ठेवा – लांबच्या प्रवासात तुमच्या मुलाला कंटाळा येऊ नये म्हणून त्यांची आवडती खेळणी, पुस्तके किंवा सॉफ्ट टॉय तुमच्यासोबत ठेवा.

ब्रेक घ्या – तुम्ही जर रोड ट्रिपवर असाल तर दर एक किंवा दीड तासांनी एक छोटा ब्रेक घ्या जेणेकरून मूल थोडंस फिरू शकतील आणि त्यांची चिडचिड होणार नाही.

स्वच्छतेची विशेष काळजी घ्या – सॅनिटायझर, टिश्यू, बेबी सोप आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा, जेणेकरून प्रवासादरम्यानही स्वच्छता राखली जाईल.

तुमच्या जेवणाचे आधीच प्लॅन करा – जर तुमची मूलं ठराविक पदार्थ खात असतील तर ते आधीच पॅक करा आणि त्यांना बाहेरचे अन्न देणे टाळा.

शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा- प्रवासादरम्यान तुमचं मूल रडत असेल किंवा अस्वस्थ असेल तर त्यांना प्रेमाने हाताळा. जर तुम्ही त्यांच्यावर रागावलात तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

मोबाईलचा वापर मर्यादित करा – मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी मोबाईल फोन किंवा टॅब्लेटचा वापर मर्यादित करा. त्याऐवजी त्यांना बोलण्यात किंवा खेळांमध्ये गुंतवून ठेवा.

छोटी ट्रिपचा करा प्लॅन- तुम्ही जर पहिल्यांदाच मुलांना फिरायला घेऊन जात आहात तर छोटी ट्रिपचा प्लॅन करा. तर तुमच्या मुलाला जवळच्या महत्त्वाच्या ठिकाणी घेऊन जा.

पालकांनीही शांत आणि तयार राहिले पाहिजे- जेव्हा पालक शांत आणि मानसिकदृष्ट्या तयार असतात, तेव्हा ते कठीण परिस्थितीतही धीर धरू शकतात. यामुळे मुलाला सुरक्षिततेची भावना येते आणि प्रवास तणावमुक्त होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.