IPL 2026 : KKR चा सर्वात मोठा निर्णय, आंद्रे रसेलला दाखवला बाहेरचा रस्ता, या खेळाडूंचाही पत्ता कट
Tv9 Marathi November 15, 2025 10:45 PM

IPL 2025 साठी 16 डिसेंबरला मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी प्रत्येक संघाला रिलीज केलेल्या आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची होती. आज रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याचा शेवटचा दिवस होता. कोलकाता नाईट रायडर्सने मोठा निर्णय घेत स्टार मॅचविनर ऑलराऊंडर आंद्रे रसेलसह काही प्रमुख खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आंद्रे रसेलने केकेआरसाठी चमकदार कामगिरी केलेली आहे, मात्र गेल्या काही सीजनमध्ये तो संघासाठी उपयोगी ठरला नव्हता, त्यामुळे आता त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केकेआरने या खेळाडूंना केले रिलीज

कोलकाता नाईट रायडर्सने स्टार खेळाडू आंद्रे रसेलला रिलीज केले आहे. सोबतच लवनीथ सिसोदिया, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन, एनरिक नॉर्टजे, चेतन साकारिया ​​या खेळाडूंनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या खेळाडूंना रिलीज केल्यामुळे केकेआरच्या पर्समध्ये मोठी रक्कम जमा होणार आहे. कारण रसेलसाठी केकेआरने 12 कोटी, व्यंकटेश अय्यर साठी 23.75 कोटी, क्विंटन डी कॉक 3.6 कोटी, मोईन अली 2 कोटी आणि नरिक नोखियासाठी 6.5 कोटी रुपये मोजले होते. या सर्व खेळाडूंनी रिलीज केल्यामुळे आता केकेआरकडे लिलावासाठी मोठी रक्कक असणार आहे.

केकेआरने रिटेन केलेले खेळाडू

केकेआरने आगामी सीजनसाठी अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, अंगकृष्ण रघुवंशी, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोड़ा, उमरान मलिक.या खेळाडूंना रिटेन केले आहे. तर मयंक मार्कंडेला मुंबईसोबत ट्रेड केले आहे.

From Eden to the world: Your 𝐫𝐞𝐭𝐚𝐢𝐧𝐞𝐝 Knights for 2026 😍💜 pic.twitter.com/xL4ClNltUF

— KolkataKnightRiders (@KKRiders)

आगामी लिलावात संघ बांधणीवर भर द्यावा लागणार

केकेआरने 3 वेळा आपपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आता केकेआरला आगामी सीजनसाठी चांगली संघ बांधणी करावी लागणार आहे. आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यरला कमी किमतीत खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. संघाला एका चांगल्या सलामीवीराची गरज आहे, यासाठी संघ एखाद्या परदेशी खरेदी करण्याचा विचार करू शकतो. एनरिक नोखियाच्या जागी संध विदेशी वेगवान गोलंदाज खरेदी करण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.