जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता, तेव्हा कधी-कधी तुम्हाला रस्त्यात एखादी वस्तू सापडते, असं अनेकदा यापूर्वीही आपल्यासोबत घडलं असेल. तुम्हाला रस्त्यात सापडणारी ती वस्तू मग कोणतीही असू शकते, कधी-कधी रस्त्यात तुम्हाला पैसे सापडतात. कधी पुजेचं सामान सापडतं, तर कधी एखादी विशिष्ट वस्तू सापडते, जेव्हा आपल्याला रस्त्यात अशी वस्तू सापडते, त्यावेळी आपण काय करतो? एक तर ती वस्तू उचलून घरी आणतो, किंवा ती तिथेच रस्त्यात जशी आहे, तशी पडू देतो. मात्र तुम्हाला रस्त्यात जेव्हा अशा काही वस्तू सापडतात, त्या तुमच्यासाठी लकी ठरू शकतात, तर काही अशा वस्तू असतात ज्या रस्त्यात सापडल्या तर ते अशुभ मानलं जातं. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या जर तुम्हाला रस्त्यात सापडल्या तर त्याचा अर्थ असा होतो की आता लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे.
पैसे
शकुन शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घराच्या बाहेर पडल्यानंतर रस्त्यात कुठेही पैसे सापडले तर ही गोष्ट शुभ मानली जाते, लवकरच तुम्हाला मोठ्या धनाची प्राप्ती होणार आहेत, या गोष्टीचे हे संकेत असतात. येणाऱ्या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे, तुमच्या हातात पैसा येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. मात्र जेव्हा तुम्हाला रस्त्यात असे पैसे सापडतात तेव्हा त्याला घरी घेऊन येऊ नका, तर ते पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील.
मोराचा पंख
वास्तुशास्त्रानुसार मोराचा पंख हा सौभाग्य आणि लक्ष्मी माता यांचं प्रतीक आहे. जर तुम्हाला रस्त्यात मोराचा पंख सापडला तर समजून जा लवकरच तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येणार आहेत, या गोष्टीचा हा संकेत असतो, जर तुम्हाला रस्त्यात मोर पंख सापडला तर लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते.
पिवळे फूल
शकून शास्त्रानुसार जर तुम्हाला रस्त्यात पिवळं फूल सापडलं तर ते खूप शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की आता लवकरच तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या घरात धनाचा वर्षावर होणार आहे.
फळ
तुम्हाला रस्त्यात कोणतंही फळ मिळालं तर हा आणखी एक शुभ संकेत असतो, याचा अर्थ तुम्ही जे काम करण्यासाठी घरातून बाहेर पडले आहात, त्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)