Video: शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्तेखानावर कसा केला होता सर्जिकल स्ट्राईक? AI LIVE रिपोर्टींग व्हायरल, शिवभक्त असाल तर नक्की पाहा
esakal November 16, 2025 01:45 AM
chhatrapati shivaji maharaj

पुण्यातील लाल महालात १६६३ मध्ये घडलेला शिवाजी महाराजांचा धाडसी हल्ला आता AI मदतीने पुन्हा जिवंत झाला आहे. "शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्तेखानावर कसा केला होता सर्जिकल स्ट्राईक?" असा प्रश्न उपस्थित करणारा हा AI जनरेटेड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहिस्तेखानाच्या खोलीत पोहोचून अचानक हल्ला

व्हिडिओत दाखवले आहे की, मध्यरात्रीच्या वेळी मराठा सैनिक गुप्तपणे लाल महालात घुसतात. शिवाजी महाराज स्वतः पुढे असतात आणि शाहिस्तेखानाच्या खोलीत पोहोचून अचानक हल्ला करतात. शाहिस्तेखान घाबरून बिछान्याखाली लपतो, पण महाराजांच्या तलवारीचा वार त्याच्या बोटांना स्पर्श करतो. बोटं तुटलेल्या अवस्थेत शाहिस्तेखान ओरडतो आणि जीव वाचवण्यासाठी पळ काढतो. मोगल सैनिकांची धावपळ उडते, पण मराठे यशस्वीपणे निसटतात. हे सर्व दृश्य इतके जीवंत आहे की, प्रेक्षकांना वाटते आपण त्या काळातच आहोत.

Shivaji Maharaj: इतिहासाचा उलगडा! शिवाजी महाराज घोडेस्वारांसाठी किती कोट्यवधी खर्च करत असत? लाईव्ह रिपोर्टिंग स्वरूप

हा व्हिडिओ अमोल बोरुडे यांने तयार केला आहे. त्याने AI टूल्सचा वापर करून ऐतिहासिक वर्णनांना आधार घेऊन हे लाईव्ह रिपोर्टिंग स्वरूप दिले आहे. व्हिडिओत मराठा सैनिकांच्या शौर्याचे, शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे आणि शाहिस्तेखानाच्या पराभवाचे दृश्ये इतके प्रभावी आहेत की, ते पाहताना रोमांच उभे राहतात. शाहिस्तेखान कसा पळाला, त्याची बोटं कशी तुटली आणि मोगलांची कशी बदनामी झाली, हे सर्व बारकाईने दाखवले आहे.

लाल महालावर हल्ला

५ एप्रिल १६६३ रोजी रात्री शिवाजी महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून होता आणि मराठ्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत होता. पण महाराजांच्या या सर्जिकल स्ट्राईकने मोगल साम्राज्य हादरले. शाहिस्तेखानाच्या बोटं तुटले, त्याचा विश्वास ढासळला आणि औरंगजेबाला मोठा धक्का बसला. या हल्ल्यामुळे मराठा स्वराज्याची पताका अधिक उंचावली.

View this post on Instagram
डिस्क्लेमर

ही बातमी AI-जनरेटेड व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे, परंतु पूर्णतः मनोरंजन आणि शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेली दृश्ये, संवाद आणि लाईव्ह रिपोर्टिंग स्वरूप AI साहाय्याने दाखवण्यात आले आहे. हे वास्तविक घटनांचे दस्तऐवजीकरण नाही.

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.