Solapur News: नगरपरिषद निवडणुकीचा रंग दिवसागणिक गडद होत आहे. भाजपच्या विरोधात लढायचंच, हे जवळपास सर्वांचेच ठरले आहे. पण लढताना झेंडा कोणता वापरायचा?, महाविकास आघाडीचा की स्थानिक आघाड्यांचा ? याबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.
जिल्ह्यात भाजप विरोधात लढताना बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा मोडला जाणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी उमेदवारी दाखल करण्यास सोमवारपर्यंतची (ता. १७) मुदत आहे.
भाजप विरोधात लढताना सोमवारी उमेदवारी अर्जासोबत कोणता उमेदवार कोणता ए व बी फॉर्म जोडणार? यावरून संबंधित नगरपरिषदेतील चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि सेकंड नंबरचे इलेक्टिव्ह मेरिट असलेला कार्यकर्ता विरोधकांच्या हाताला लागू नये यासाठी भाजप विशेष काळजी घेताना दिसत आहे. भाजपच्या उमेदवारीचे पत्ते शेवटच्या क्षणी ओपन होण्याची शक्यता आहे. भाजपच्या या खेळीमुळे त्या त्या तालुक्यातील विरोधकांचे राजकीय गणित बिघडताना दिसत आहे.
Scorpio Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी प्रेम अन् कौटुंबिक जीवनात काय बदल येणार? एका क्लिकमध्ये जाणून घ्या संपूर्ण भविष्यजिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक एक खासदार आहेत. भाजपकडे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे चार आमदार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा एक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक आमदार आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत केलेली मदतीची परतफेड नगरपरिषद निवडणुकीतून करण्यासाठी महाविकास आमदार, खासदार व शेकापचे आमदार पक्षाच्या झेंड्याचा फारसा आग्रह धरताना दिसत नाहीत. यातून २०२४ च्या मदतीची परतफेड आणि २०२९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची राजकीय जुळवाजुळव यातून होताना दिसत आहे.
स्वबळ मुखात, कार्यकर्ता दिसेना मैदानात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या मुखात दिसत आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडे एकही प्रभावी नेता राहिला नाही. खासदार प्रणिती शिंदे यांचे या निवडणुकीकडे पूर्ण दुर्लक्ष दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी उरली नाही. नेत्यांच्या मुखात स्वबळाची भाषा आणि कार्यकर्ता दिसेना मैदानात अशीच सध्या जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती आहे. आम्ही स्वबळावर लढणार असे काँग्रेस कार्यकर्ता बोलल्यास त्यावर लोक हसत आहेत.
अकलूजभाजपविरुद्ध मोहिते-पाटील लढाई स्पष्ट आहे. मोहिते-पाटील 'तुतारी'वर लढणार की स्थानिक आघाडीवर याचा निर्णय प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूरभाजप विरुद्ध भालके अन् नागेश भोसले यांचा गट अशा तिरंगी लढतीची शक्यता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या झेंड्याला फार महत्व दिसत नाही.
मोहोळभाजप विरुद्ध दोन शिवसेना अशा तिरंगी लढतीची शक्यता आहे. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीच्या झेंड्याला फारसे महत्व दिसत नाही. माजी आमदार राजन पाटल यांच्यामुळे अनगर नगरपंचायतीत भाजपला पहिल्यांदा एकहाती यश मिळेल.
Territorial Army Job 2025: सैनिक व्हा, देशाची सेवा करा! 22 राज्यांमध्ये टेरिटोरियल आर्मी भरती, शेड्यूल आणि पात्रता पाहा अक्कलकोटभाजप विरुद्ध शिवसेना आणि काँग्रेस एक होऊ शकतात. मैंदगींत स्थानिक आघाडी विरुद्ध भाजप आणि दुधनीत भाजप विरुद्ध शिवसेना लढतीची शक्यता आहे. तालुक्यात शिवसेना उबाठा अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या झेंड्याला महत्व नाही.
मंगळवेढाभाजप विरुद्ध लढण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीची चाचपणी सुरू आहे. झेंडा कोणता वापरायचा? याबाबत एकमत होताना दिसत नाही. तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे (शप) थोडेफार महत्व आहे. झेंडा कोणाचा यावर चुरस अवलंबून आहे.
करमाळाभाजप विरुद्ध शिवसेना व सावंत गट असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी शिवसेनेसोबत राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी युती या तालुक्यात होऊ शकते.
कुर्डुवाडीराष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइंची युती झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजप स्वतंत्र लढल्यास तिरंगी लढतीची शक्यता आहे. येथील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गुण्या गोविंदाने एकत्रित दिसत आहे.
सांगोलाप्रवेशापूर्वीच दीपक साळुंखे भाजपसाठी झटताहेत. शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भूमिका स्पष्ट नाही. शहाजी पाटील धनुष्यावर लढण्याच्या तयारीत. तालुक्यौल आयत्या वेळेची युती अनेकांना धक्का देणारी ठरु शकते.
बार्शीशिवसेना उबाठाचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी (शप)ला सोबत घेण्याची तर राजेंद्र राऊत यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा मेळ घातल्याचे दिसते. पण निवडणुकीत सोपल कोणते चिन्ह घेणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.