04508
अॅड. गवस यांना धमकी
देणाऱ्यावर कारवाई करा
वकील संघटनेचे पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ : येथील अॅड. श्रीनिवास गवस यांना पक्षकाराकडून न्यायालयाच्या आवारातच धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याची तातडीने दखल घेऊन संबंधितावर कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सावंतवाडी वकील संघटनेने शुक्रवारी (ता. १४) सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र राज्यात अशा प्रकारचे प्रकार वारंवार घडत असल्याने या घटनेची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष बालाजी रणशुर, ज्येष्ठ वकील दिलीप नार्वेकर, श्रीनिवास गवस, शामराव सावंत, संदीप निंबाळकर, नीलिमा गावडे, अजित राणे, विजय शंभरकर, संतोष गावडे, सुखानंद सावंत, सुमित सुकी, पूजा ओटवणेकर, सिद्धी परब, रामानंद बावकर, राहुल मडगावकर, प्रीतेश सावंत, राहुल पै, गौरव केसरकर, वर्षा गोरे, स्वप्नील कोलगावकर, माधवी पेंडुरकर, प्रतीक्षा भिसे, संकेत नेवगी आदी उपस्थित होते.