कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आणि भारत दक्षिण अफ्रिका खेळणार वनडे, जाणून घ्या सर्वकाही
Tv9 Marathi November 16, 2025 06:45 AM

दक्षिण अफ्रिका आणि दक्षिण अफ्रिका अ संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ भारतासोबत मालिका खेळत आहेत. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात सुरु असून दोन दिवसांचा खेळ संपला आहे. दोन दिवसातच 28 विकेट पडल्या आहेत. त्यामुळे तिसरा दिवस हा निर्णायक असू शकतो. सामन्याचा निकाल लागणार हे निश्चित आहे. पण तिसऱ्या दिवशी लागणार की चौथ्या दिवशी हे काही सांगता येत नाही. भारताने दक्षिण अफ्रिकेच्या तीन विकेट झटपट काढल्या तर मात्र या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच लागेल. असं असताना हा सामना सुरु असताना क्रीडाप्रेमींना आणखी एका सामन्याची पर्वणी मिळणार आहे. भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघात दुसरा अनौपचारिक वनडे सामना होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत.

भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ दुसरा एकदिवसीय सामना थेट प्रक्षेपण

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील दुसरा अनौपचारिक एकदिवसीय सामना भारतात प्रसारित केला जाणार नाही. हा सामना जिओ हॉटस्टार एप आणि वेबसाइटवर दुपारी 1.30 वाजता भारतीय वेळेनुसार थेट प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अधिकृत माहिती नाही. दुसरा एकदिवसीय सामना 16 नोव्हेंबर राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताने याच मैदानावर पहिला सामना 4 गडी राखून जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण अफ्रिका अ संघ: रुबिन हरमन (विकेटकीपर), रिवाल्डो मूनसामी, जॉर्डन हर्मन, मार्केस अकरमन (कर्णधार), सिनेथेम्बा केशिले, डियान फॉरेस्टर, डेलानो पॉटगिएटर, ब्योर्न फोर्टुइन, टियान व्हॅन वुरेन, त्शेपो मोरेकी, ओटनील बार्टमन, जेसन एन म्प्लीनाबा, मिह्लनाली स्मिथ्वा, मिह्ल्नाली माफाका, कोडी युसुफ, लुआन-ड्रे प्रिटोरियस.

भारत अ संघ: ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, तिलक वर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, निशांत सिंधू, हर्षित राणा, विपराज निगम, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, खलील अहमद, आयुष बडोनी, प्रभसिमरन सिंग, मानव सुतार.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.