टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची दणदणीत सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा पहिल्याच सामन्यात 30 धावांनी धुव्वा उडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र फिरकीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने भारताचं 35 ओव्हरमध्ये 93 धावांवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तसेच दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे.