किंमत ऐकून विश्वास बसणार नाही,लॉटरी तिकीटाने केले मालामाल, जिंकले तब्बल 87 अब्ज रुपये
GH News November 16, 2025 07:11 PM

लॉटरीच्या कागदाचा तुकडा विकत घेऊन अनेक जण श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतात. अनेक लोक लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावत असतात. परंतू शुक्रवारी रात्री अमेरिकेतील जॉर्जियातील एका व्यक्तीला लॉटरीच्या तिकीटातून मोठा जॅकपॉटच लागला. मेगा मिलियन्स लॉटरीने घोषणा केली आहे की एका तिकीटाला सुमारे ९८० मिलियन डॉलर ( सुमारे ८७ अब्ज रुपये ) जॅकपॉट लागला आहे. हा इतिहासातील आठ मोठ्या जॅकपॉट पैकी आहे. मेगा मिलियन्सने सांगितले की हा जॅकपॉट जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सातत्याने वाढत होता. शुक्रवारच्या ड्रॉमध्ये जॉर्जियात विकले गेलेल्या एका तिकीटाचे सर्व सहा नंबर मॅच झाले आहेत.

ड्रॉमध्ये जे नंबर आले होते त्यात १,८,११,१२ आणि ५७. तर गोल्ड मेगा बॉल होता ७. एकूण बक्षिस सुमारे ९८० मिलीयन डॉलर आणि कॅश ऑप्शन ४५२.२ मिलीयन डॉलर सांगितले जात आहे. हा नोव्हेंबर महिन्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे इनाम आहे. तसेच मेगा मिलियन्सच्या इतिहासातील आठवा सर्वात मोठा जॅकपॉट आहे. यापूर्वी सर्वात मोठे बक्षिस डिसेंबर २०२४ मध्ये लागले होते. तेव्हा कॅलिफोर्नियाच्या एका खेळाडूने १.२६९ अब्ज डॉलर जिंकले होते. २७ जून रोजी व्हर्जिनियात ३४८ मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकल्यानंतर सातत्याने ४० ड्रॉ झाले. मेगा मिलियन्सच्या इतिहासात सर्वात मोठा जॅकपॉट रन होता. या ड्रॉच्या दरम्यान १.४३ कोटी जिंकणारे तिकीट वेगवेगळ्या टप्प्यांवर काढली गेली.

बक्षिसाची व्हॅल्यू देखील वाढली

मेगा मिलियन्सने सांगितले की एप्रिलमध्ये गेमचे नवे नियम लागू झाल्यानंतर बक्षिसाची रक्कम खूप वाढली आहे. केवळ नॉन-जॅकपॉट प्राईज सुमारे ३४३.४ मिलियन डॉलरपर्यंत पोहचले आहे. यात २ मिलियन डॉलर वा त्याहून जास्त २१ सेकंड – टीयर प्राईज देखील सामील आहेत.जे अ‍ॅरिझोना, कॅलिफोर्निया, केंटकी, फ्लोरिडा, जॉर्जिया, इलिनॉय, आयोवा, मिशिगन, मिसिसिपी, न्यू जर्सी, न्यू यॉर्क, नॉर्थ कॅरोलिना, टेक्सास आणि व्हर्जिनियामध्ये जिंकले गेले.

मेगा मिलियन्सने एप्रिलमध्ये त्यांचा फॉर्मेट बदलला आणि तिकीटाची किंमत २ डॉलरवरुन वाढवून ५ डॉलर केली होती. यामुळे जॅकपॉट आधीपेक्षा जास्त वेगाने वाढेल.

सुरुवातीची रक्कम देखील २० मिलियन डॉलर वरुन वाढवून ५० मिलियन डॉलर केली आहे.मेगा मिलियन कंसोर्टियमचे लीड डायरेक्टर जोशुआ जॉनसन यांनी सांगितले की एप्रिलमध्ये मेगा मिलियन्स गेममध्ये बदल झाल्यानंतर आतापर्यंत जिंकलेला सर्वात मोठा जॅकपॉट ९८० मिलियन डॉलर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.