पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात २६ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन वर्ष, एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची संपूर्ण यादी व रहिवासी ठिकाणांचा तपशील पोलिसांनी जाहीर केला. पोलिस कारवाईने स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवली असून, गुन्हे प्रतिबंधासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा ठोस उपाय दिसून येतो.
कारवाईचा तपशील असा
दोन वर्षांसाठी तडीपार ः राहुलसिंग ऊर्फ कद्दा रमेशसिंग टाक (रा. भारतनगर, भोसरी), रोहित ऊर्फ नन्या राजेश मिश्रा (रा. नेहरूनगर, पिंपरी), पवन सचिन ससाणे (रा. गांधीनगर, पिंपरी), स्वप्नील अरुण लांडे (रा. सोमाटणे फाटा, शिंदे वस्ती, मावळ), जय ऊर्फ कीटक प्रवीण भालेराव (रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव स्टेशन), निखिल दत्तात्रय पोकळे (रा. चौराईनगर सोमाटणे), विशाल ऊर्फ साकी संजय गायकवाड (रा. वाकड), नीलेश शंकर वाघमारे (रा. वाकड गावठाण), मनोज ऊर्फ नाना शंकर दूनघव (रा. शांतिनगर, भोसरी), सचिन दीपक लोखंडे (रा. लक्ष्मीरोड चिखली).
गावगुंड होणार तडीपार! झेडपी, महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर पोलिसांनी तयार केली रेकॉर्डवरील ६७०० गुन्हेगारांची यादी; अनेकांवर ‘एमपीडीए’चीही कारवाईएका वर्षासाठी तडीपार ः अमित गजानन वानरे, विशाल बाळू वाजे, प्रेमगोरक्ष साकोरे (तिघेही रा. किवळे), राकेश मधुकर रेणुसे (रा. पाचाणे, मावळ), सिद्धार्थ नागनाथ थोरात (रा. निळकंठनगर, तळेगाव दाभाडे), संदीप रमेश सूर्यवंशी (रा. शिरगाव), रीना गोविंद नट (रा. चऱ्होली फाटा, चऱ्होली) व नवनाथ बाळू धोंगडे (रा. दत्त मंदिर, चाकण).
सहा महिन्यांसाठी तडीपार ः ऋषिकेश दादाभाऊ बोरुडे (रा. ज्योतिबा नगर, काळेवाड़ी), ज्योती गोरख राठोड (रा. आंबी, मावळ), करिष्मा निर्मल राठोड (रा. चांदखेड, मावळ), रविना विश्वास राठोड (दोघेही रा. चांदखेड, मावळ), माला अनिल गुंजाळ (रा. म्हातोबानगर, वाकड), राजतिलक धर्मा राठोड (रा. पांडवनगर, हिंजवडी), लच्छाराम पुनाराम देवासी (रा. फेज ३ माण), अंचिता अनिरुद्ध रॉय (रा. सुसगाव).