Ananya Panday Abou Gen Z Mindset: फॅशन, फिल्म किंवा काही ना काही कारणामुळे अनन्या पांडे चर्चेत असते. आता सुद्धा ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. पण या वेळी तिच्या फॅशन किंवा मुव्हीच्यामुळे नाही तर एका वक्तव्यामुळे. Two Much या काजोल आणि ट्विंकलच्या शोमध्ये अनन्यानेखुलेपणाने आपले विचार मांडले, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ऍमेझॉन प्राईमवर सुरु असलेल्या Two Much With Kajol And Twinkle हा शो बऱ्यापैकी लोकांच्या पंसतीस पडला आहे. याच शोच्या एका एपिसोडमध्ये अनन्या आणि फराह खान गेस्ट म्हणून आले होते. तेव्हा Generation Z बद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे दावे केले जात होते. तेव्हा अनन्या Gen Z बद्दल स्ट्रॉंग स्टॅन्ड घेत त्यांची बाजू मांडली आहे.
Twinkle Khanna Jealous of Men: 'या' कारणामुळे अक्षय कुमारची बायको पुरुषांवर जळते! बोलली अनेक बायकांच्या मनातील गोष्टअनन्या म्हणाली," “लोक आम्हाला आळशी आहोत किंवा लवकर विचलित होतो असं म्हणतात, पण खरं तर आम्ही फक्त गोष्टी वेगळ्या पद्धतीने शिकत आहोत. आम्ही एका नव्या जगाशी जुळवून घेत आहोत, जिथे याशाइतकंच संतुलन, मानसिक शांतता आणि स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करणं महत्त्वाचं आहे."
मात्र याला फराह खान, काजोल आणि ट्विंकल यांनी विरोध केला. फराह खान म्हणाली, " हे तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे प्रत्येक गोष्टीतच मानसिक स्वास्थ्य अगदी Too Much करतात."
सोशल मीडियावर या विधानाला लगेचच मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. अनेक तरुण तरुणींनी अनन्याच्या विचारांशी सहमती दाखवली आहे. तिचे कौतुक करत तिने त्या पिढीच्या मानसिकतेला अगदी अचूकपणे व्यक्त केले आहे, अशी प्रतिक्रिया जास्त प्रमाणात पहायला मिळत आहे.
'पुरुषांना सुद्धा मासिक पाळीच्या वेदना झाल्या पाहिजेत' अभिनेत्री रश्मिका मंदानाचं वक्तव्य, नेटकरी म्हणाले, 'पुरुषांचा त्रास...'अनन्याच्या म्हणण्यानुसार, Generaion Z त्यांच्या भावना खुलेपणाने व्यक्त करते. आम्हीच अशी पहिली पिढी आहोत जी मनातल्या भावनांबद्दल खुलेपणाने बोलते. आम्ही कारणांसाठी उभे राहतो आणि जे योग्य वाटत नाही त्यावर प्रश्न विचारायला आम्हाला भिती वाटत नाही.
अनन्याच्या या बोलण्यावरून आताच्या पिढीतील काम करण्याची पद्धत, आधीच्या आणि आताच्या पिढ्यांमधील विचारांचा फरक यावर पुन्हा चर्चा रंगली आहे.