मंगळवेढा : नगरसेवक होण्यासाठी पक्षीय उमेदवाराबरोबर अपक्ष उमेदवार आपापल्या प्रभागात चाचपणी करत आहेत त्यासाठी सर्वेचा आधार घेतला जात आहे. मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण ? यावर अद्याप जाहीर नसल्यामुळे आज संगीता कट्टे यांचा अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाला. आज रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील निवडणूक आयोगाने अर्ज स्वीकृतीसाठी उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे आज आतापर्यंतच्या अर्ज दाखल करण्यामध्ये विक्रमी अर्ज दाखल झाले.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पक्ष आणि अपक्ष असे दोन पर्याय देण्यात आले होते आघाडीतून लढण्याचा पर्याय दिला नव्हता तो पर्याय आज दुपारपासून उपलब्ध झाल्यामुळे आतापर्यंत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आघाडीतून एकच चिन्ह मिळावे म्हणून लढण्यासाठी संकेतस्थळ डाऊन होईल या भीतीपोटी आज रात्रभर पुन्हा अर्ज दाखल करण्याच्या झटावे लागणार आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची वर्दळउद्या दि.17 अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रमुख मातब्बराचे अर्ज आज दाखल होणार आहेत त्यामुळे नगरपालिकेत मोठी गर्दी होणार आहे.अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष भारत नागणे,माजी नगरसेवक कमल मुदगूल व चंद्रशेखर कोंडूभैरी, पत्रकार महादेव धोत्रे, भारतीय जनता पार्टीचे गौरीशंकर बुरकूल यांचा समावेश आहे. सात उमेदवारांनी दुबार अर्ज दाखल केले अर्ज दाखल करण्यापूर्वी इच्छुकांनी प्रभागात असलेल्या जेष्ठ मतदारांचा आशीर्वाद घेऊन वाजत गाजत शिवाय फटाक्याची आतिषबाजी करत नगरपालिकेत येत उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी या मार्गावर भेटलेल्या अनेक जाणकार व वरिष्ठ नेत्यांचे पदस्पर्श करून निवडणुकीत सहकार्य करण्याचे अपेक्षा व्यक्त केली.त्याचबरोबर मार्गावर असलेल्या देवी आणि देवतांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे कौल मागितला. आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये आशा मेटकरी, प्रतीक्षा मेटकरी,संतोष नागणे, अनिता नागणे,करण नागणे, नंदकुमार साळुंखे, प्रवीण गोवे, सुनीता अवघडे, तात्यासाहेब पाटील, भारत नागणे, प्यारेलाल सुतार, मच्छिंद्र चव्हाण, प्रीती सूर्यवंशी,संध्या कौडूभैरी, संगिता जावळे, कमल मुद्गुल, मनीषा मेटकरी, देवदत्त पवार, संजय नलवडे,गौरीशंकर बुरकूल, संतोष जाधव, महादेव धोत्रे, महादेव जाधव,सुरेश कट्टे,चंद्रशेखर कोंडूभैरी,निवृत्ती कदम,सावित्रीबाई कोंडूभैरी,रुबीनाबी इनामदार, प्रशांत गायकवाड, गुलनाज काजी