91 Year Old Singaporean Man Becomes Inspiration for Many: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच गाजताना दिसत आहे. कारणही तसंच आहे. उतार वयात जेव्हा रिटायर होऊन, उरलेलं आयुष्य आरामात घालवायचं असा विचार करत असतानाच सिंगापूरमधीरल एक ९१ वर्षाचे आजोबा मात्र सार्वजनिक शौचालयामध्ये काम करत आहेत. आणि तेही ७ किंवा ८ तास नाही तर तब्बल १२ तासांची ड्युटी करताना हे आजोबा करत आहेत.
विशेष म्हणजे ९१ व्य वर्षी सुद्धा ते एकदम ठणठणीत असून निरोगी आयुष्य जगात आहे. ऑस्ट्रेलिअन ट्रॅव्हलर जेडन लायंग याने त्यांची दखल घेत त्यांच्याशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आणि नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सिंगापूरमध्ये फिरत असताना लायंगची एका साध्या, शांत दिसणाऱ्या आजोबांशी भेट झाली. ते सार्वजनिक शौचालयात (Public Toilet) काम करत होते. लायंगने फक्त त्यांना हॅलो केलं, पण पुढचा संवाद त्याला अक्षरशः आश्चर्यचकित करून गेला.
लायंगशी बोलताना ते आजोबा म्हणले ते फक्त ९१ वर्षांचे आहेत. तरीही दररोज वेळेवर कामावर येणे, आणि १२ तासांची ड्युटी अगदी कोणतीही कुरकुर न करता पार पाडणे हे ते एकदम सहज करतात. हे ऐकून लायंग थक्क झाला.
गप्पा मारताना त्याने विचारलं, “इतक्या वयात तुम्ही इतके फिट कसे राहता?” तेव्हा आजोबा अगदी मनापासून हसले आणि म्हणाले “काही खास नाही बाबा… जे खातो तेच खातो, व्यायाम तर करतच नाही. सकाळी कामाला यायचं, काम करायचं आणि घरी जायचं. फक्त… थांबत नाही. चालत राहतो.”
View this post on Instagram
त्यांचं ते साधं उत्तर लायंगच्या मनाला चटकन भिडलं आणि त्याने त्या आजोबांना एक छोटी टीपही दिली. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तो लोकांना दयाळू आणि प्रेमळ राहण्यासाठी तसेच वयस्कर लोकांचा आदर करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रियाया व्हिडिओने खूप कमी वेळात सोशल मीडियावर आखो लोकांची मनं जिंकली. लोकांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या
एकाने लिहिलं, “तो इतका निरोगी आहे कारण तो रोज सक्रिय असतो.” तर दुसरा म्हणाला, “आपण एकमेकांशी अशी वागणूक ठेवली तर जग खरंच स्वर्ग बनेल.”
एका प्रेक्षकाने दुःख व्यक्त करत लिहिलं, “आपल्या देशात इतक्या वयाच्या ज्येष्ठांना अजूनही साफसफाई किंवा फूड कोर्टमध्ये काम करावं लागतं, हे बघून वाईट वाटतं. पण तुम्ही त्यांचा दिवस सुंदर केलात, याचं कौतुक.” तर आणखी एकाने लिहिलं, “कोणीतरी त्याला त्याचा दिवस कसा गेला विचारलं… हेच त्याला सगळ्यात जास्त छान वाटलं असेल. त्याचा आदर केलात, यासाठी सलाम.”