लोहगाव : लोहगाव परिसरातील हरणतळे वस्ती येथे बिबट्या दिसल्याची घटना उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही रहिवाशांनी बिबट्याच्या हालचाली मोबाईलमध्ये कैद केल्याचेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पाटील वस्ती परिसरातही बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले होते.
यापूर्वीही या परिसरात तरस फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. हरणतळे वस्तीस लागूनच वनविभागाची विस्तीर्ण जमीन असून, मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने या भागात वन्यप्राण्यांची वर्दळ वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Pune Crime:'पेट्रोलपंप कर्मचाऱ्यावर हल्ला'; येरवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार जेरबंदवनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून, नागरिकांनी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात वनाधिकारी सुरेश वरक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, हरणतळे वस्ती परिसरात पिंजरा लावला असल्याचे सांगितले, तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.