Sangli Crime : लग्नाला नकार दिल्याने संतापला, नको ते करून बसला… रक्तरंजित घटनेने गाव हादरलं !
Tv9 Marathi November 17, 2025 08:45 PM

प्रेम… ही किती चांगली भावना आहे खरंतर, आई-वडील, बहीण-भाऊ, सगळी नाती प्रेमाने बांधलेली असतात. प्रियकर-प्रेयसीचं नातंही असंच प्रेमावर आणि विश्वासावर असतं खर, पण हेच प्रेम एकतर्फी असेल, आणि समोरून तसाच प्रतिसाद मिळाला नाही तर तेच प्रेम कधी संतापात बदलतं आणि बदल्याच्या भावनेने पेटून उठतं. त्याची धग समोरच्याला बसली की उरतो फक्त जाळ, धूर अन् राख… समोरच्यावर कितीही प्रेम असलं पण त्याचं प्रेम नसलं तर ते सोडून देण्यात शहाणपणा. पण मिळवण्याची जिद्द आली की मग सगळंच उद्ध्वस्त (Crime news) होतं. अशाच एकतर्फी प्रेमाच्या घटनेतून कित्येक संसार धुळीला मिळाले, लोकांचे जीव गेले.

असाचा काहीसा प्रकार सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे घडला. मुलीने लग्नाला नकार दिला, याचा राग आल्याने एका तरूणाचं टाळकंच फिरलं आणि त्यातच संतापाच्या भरात तो नको ते करून बसला. तरूणीने लग्नाला नकार दिल्याने भडकलेल्या मुलाने त्याच मुलीच्या वडिलांवर चक्क खुरप्याने हल्ला केला. आपल्या वडिलांना जखमी झाल्याचं पाहून त्यांना वाचण्यासाठी मुलगी मधे पडली आणि त्यात तिचं बोटचं तुटलं. एकतर्फी प्रेमातून टाकळी येथे अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले… जखमी वडील आणि मुलगी, दोघांवरही मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात र मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

लग्नासाठी घातली मागणी, पण नकाराने संतापला, नको ते करून बसला…

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सुभाष पाटील असे आरोपीचे नाव आहे तर अभयकुमार पाटील असे जखमी वडिलांचे नाव आहे. टाकळी येथील अक्षय सुभाष पाटील याने अभयकुमार पाटील यांच्याकडे लग्नासाठी त्यांच्या मुलीचा हात मागितला. मात्र अभयकुमार यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावत लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अक्षय खूप नाराज होता. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो हाँ नकार पचवू शकलवा नाही, त्याच्या डोक्यात राग होता.

मुलीचं बोटचं तुटलं 

रविवारी अभयकुमार यांच्या मुलीचा साखरपुडा ठरला होता. ही माहिती कळताच अक्षय संतापाने धुमसू लागला. रविवारी अक्षयने एका बॅगेमध्ये खुरपं लपवलं आणि तो अभयकुमार पाटील यांच्या घराजवळ पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने अचनाक अभयकुमार यांच्या डोक्यात खुरप्याने वार केला. अवचित झालेल्या या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. वडिलांवर झालेला हा हल्ला पाहून त्यांची मुलगी घाबरली, मात्र तरीही ती बाबांना वाचवण्यासाठी धावून आली. अक्षयने केलेला हल्ला रोखताना त्याने केलेल्या खुरप्याच्या वारात तिचं एक बोट पूर्णपणे तुटले.

या हल्ल्यानंतर अक्षय पाटील तिथून पळून गेला. खुरप्याच्या वारात गंभीर जखमी झालेले वडील आणि मुलगी या दोघांनाही तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस कर्मचारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी हल्लेखोर अक्षय पाटील याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिस त्याचा कतसून शोध घेत आहेत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.