वडगाव शेरी : वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून विमाननगरमध्ये सोमवार (ता १७) पासून येथी दोन मुख्य रस्त्यावर एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मात्र पूर्ण तयारी न करता हा प्रयोग राबवल्यास पूर्वीप्रमाणेच योजनेचा बोजवारा उडेल असा आरोप स्थानिक नागरिक संघटनांनी केला आहे.
Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव..विमानतळ वाहतूक पोलीस ठाणे अंतर्गत विमाननगर येथे कैलास सुपर मार्केट चौक, गणपती चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल चौक येथे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्यामुळे वाहतूक पोलीस उपायुक्त आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करून एकेरी वाहतुकीचा प्रयोग तिसऱ्यांदा राबवण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा हा प्रयोग राबवण्यात आलेला होता. मात्र दोन्ही वेळी स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रयोग मागे घेण्यात आला होता.
त्यानुसार श्रीकृष्ण हॉटेल चौक ते दत्त मंदिर चौक मार्गे चौकापर्यंत आणि गंगापूरम चौक येथून कैलास सुपर मार्केट चौक मार्गे गणपती चौकापर्यंत एकेरी वाहतूक असेल. तसेच या दोन मुख्य रस्त्याला जोडणारे श्रीकृष्ण हॉटेल चौक ते गणपती चौक हा रस्ता, आनंद विद्यानिकेतन शाळे समोरील रस्ता, कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक हा रस्ता आणि गंगापूरम चौक ते सीसीडी चौक हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी उपलब्ध असेल.
एकेरी वाहतुकीचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर उद्यापासून ते एक डिसेंबर पर्यंत राबवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त यांच्या कार्यालयात सादर कराव्यात असे आवाहन उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
विमानतळाचे वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र कदम म्हणाले, एकेरी वाहतुकीबाबत तयारी पूर्ण झाली आहे. नागरिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांबाबत उपाययोजना करीत आहोत. गंगापूरम चौक आणि दत्त मंदिर चौकातील सिग्नल सुरू करण्यात येतील. उद्या पासून सुमारे पंचवीस कर्मचारी नागरिकांना एकेरी वाहतुकीबाबत मार्गदर्शन करतील. मान्यवरांचे उपस्थितीत उद्या या उपक्रमाला सुरुवात होईल.
-कनिज सुखरानी (सामाजिक कार्यकर्त्या)
Farmer Women: बिबट्याच्या भितीने नवीन ‘संरक्षण कवच’; पिंपरखेड परिसरातील शेतकरी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, अनोख्या उपायाची चर्चा..चार मुख्य चौकातील वाहतूक नियोजन कसे असेल, रखडलेले रुंदीकरण, अनधिकृत व्यवसायिक, व्यावसायिक वाहनांचे दुतर्फा बेकायदा पार्किंग, बंद सिग्नल, दोराबजी चौकातील व म्हाडा रस्त्यावरील कोंडी, नो एन्ट्री वाहन चालकांवर कारवाई आदी सुचवलेल्या सूचनांवर पोलिसांनी अंमलबजावणी करावी. नियोजन नसल्यामुळे हा प्रयोग यापूर्वी दोनदा फसला आहे. त्यामुळे संघटनेतर्फे सुधारणा सुचवल्या आहेत.