'वो छिछोरा आदमी है', नवाजुद्दीन सिद्दीकी मुलींबद्दल कसा आहे? अन्नू कपूर यांनी स्पष्टच सांगितलं
Tv9 Marathi November 17, 2025 10:45 PM

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी प्रियांका चोप्रा ते तमन्ना भाटियापर्यंत अनेक कलाकारांबद्दल टिप्पणी केली आहे. अनेकांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता अन्नू कपूर यांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दलही असंच एक विधान केलं आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

अन्नू कपूर यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला

अन्नू कपूर यांनीनवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभवही शेअर केला. त्यांनी सांगितले की ते नवाजने ज्या पद्धतीने त्यांना उत्तर दिले त्या उत्तरामुळे ते अतिशय नाराज झाले. नवाजला त्यांनी एक उथळ, मुलींच्याबाबत त्याचे विचार फार चांगले नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी गोव्यातील एका क्लबमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाचा उल्लेख करत त्यांनी तिथला एक किस्सा सांगितला.

अन्नू कपूर यांनी सांगितले की त्यांना काही वर्षांपूर्वी गोव्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एका क्लबमध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि त्यांना स्टेजवर नवाजुद्दीनची मुलाखत घेण्यास सांगण्यात आले होते. सुरुवातीला, ते अभिनेत्याच्या शैक्षणिक पात्रतेमुळे प्रभावित झाले होते, ज्यामध्ये त्यांनी रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे हे देखील समाविष्ट होते.

अन्नू कपूर यांनी नवाजुद्दीनला ‘छिछोरा’ व्यक्ती म्हटले

अन्नू कपूरयांनी पुढे खुलासा केला की त्यांनी नवाजुद्दीनला त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल विचारले तेव्हा नवाजने एक विचित्र उत्तर दिले, अन्नू कपूर म्हणाले, “तो फारसे उत्तर देत नव्हता, म्हणून मूड हलका करण्यासाठी, मी विचार केला की मी त्यांना त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल विचारावे. जेव्हा मी त्यांना त्यांच्या नात्यांबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, ‘कित्येक अशा आल्या आणि गेल्या…’ ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले त्यावरून मला वाटले की ते एक छिछोरा माणूस आहे. ‘अनेक जण आले आणि गेले’ याचा अर्थ काय समजायचा? ही खूपच वाईट कमेंट होती”

View this post on Instagram

A post shared by F I L M Y B A A P 🤺 | Entertainment Portal (@filmybaapofficial)


अन्नू कपूर आयोजकांवर संतापले

अन्नू कपूर यांनी पुढे स्पष्ट केले की नवाजुद्दीन सिद्दीकी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नव्हते, म्हणून तेच बोलत होते. अन्नू कपूर म्हणाले, “नंतर, आयोजकांनी तक्रार केली. ते म्हणाले, ‘सर, तुम्हीच एकटे बोलत होता.’ मी त्यांना सांगितले, ‘तुम्ही मुलाखतीसाठी कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला आणले होते? ज्याच्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हते. तो माझा अनादर कसा करू शकतो? जर त्याने असे केले असते तर मी त्याला बाहेर काढले असते. तो तर स्वतःचा पण आदर करत नव्हता.’

अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियावर केलेले वादग्रस्त वक्तव्य कोणते?

त्याच पॉडकास्टमध्ये अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियावर केलेल्या टिप्पणीवर टीका झाली आहे. शुभंकर यांनी अभिनेत्याला सांगितले की मुले तिची गाणी ऐकून झोपी जातात, ज्यावर त्यांनी उत्तर दिले, “आहा, माशाअल्लाह, तिचे शरीर किती दुधाळ आहे. झोपी जाणारी मुले किती वर्षांची असतात? जर मी इथे असतो तर मी नक्कीच विचारले असते. 79 वर्षांचा माणूसही झोपू शकतो” अशा पद्धतीने त्यांनी कमेंट केली होती ज्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. आता त्यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीबाबत केलेलं वक्तव्यही असचं व्हायरल झालं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.