Cow Attack Case: 'वैरणीसाठी गेलेल्या युवकावर गव्याचा हल्ला'; बोरगाव येथे शेतातील बांधावरील गाजर गवत कापत हाेते अन्..
esakal November 17, 2025 06:45 PM

बाजारभोगाव: पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे वैरणीसाठी गेलेल्या संदीप दिनकर काटकर या युवकावर गव्याने हल्ल्या केलेल्या गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवार सकाळी सातच्या सुमारास घडली.

संदीप काटकर हे सकाळी युवराज विठ्ठल काटकर यांच्या बारथळ नावाच्या शेतातील बांधावरील गाजर गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या गव्याने त्याच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात उजव्या बाजूला पोटात शिंग खुसले त्यामुळे पोट फाडले व डाव्या बाजूला बरकडी जवळ शिंग खुसले आहे. तसेच छातील मार लागला असून बरगड्या मोडल्या आहेत.

Pune News: 'विमाननगरमध्ये तिसऱ्यांदा एकेरी वाहतुकीचा प्रयोग'; वाहतूक कोंडीवर पोलिसांचा उपाय, आजपासून सुरु

यावेळी जवळच नांगरटीसाठी आलेले अमोल जाधव व सखाराम म्हेतर याना त्याच्या ओरडण्याचा आवाज आल त्याला गावात आणला त्यावेळी बेशुद्ध झाला तेथून बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापूरला खासगी दवाखान्यात नेले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.