10 नोव्हेंबरच्या सायंकाळी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटाने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या अगदी जवळ हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. तपास यंत्रणांच्या तात्काळ लक्षात झाले की, हा स्फोट नसून हा बॉम्बस्फोट आहे आणि याचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात होता. जम्मू काश्मीरच्या पुलवामापासून ते जैशपर्यंत या स्फोटाचे कनेक्शन पोहोचले. थेट जैशकडून या स्फोटासाठी पैसा पुरवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. 20 पेक्षा अधिक लोक या स्फोटात गंभीर जखमी झाले तर 9 हून अधिक लोकांचा या स्फोटात जीव गेला. या स्फोटाबद्दल हैराण करणारी बाब म्हणजे चक्क काही डॉक्टरांचा यात समावेश होता. एमडी मेडिसीनसारखे डॉक्टर मागील काही दिवसांपासून कट रचत होते.
पुलवामा येथील रहिवाशी दहशतवादी उमर हा गाडी चालवत होता. त्यांचे टार्गेट दिल्ली लाल किल्ला नव्हे तर अयोध्या, वाराणसी होते. मात्र, घाईघाईत हा स्फोट झाला. ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी उमर देखील गाडीत होता. लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ज्या कारमध्ये स्फोट झाला i-20 च्या कार मालकाला अटक केली. हाच या हल्ल्याचा खरा सूत्रधार असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली.
बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली i-20 ही कार काश्मीरचा रहिवाली डॉ. उमर नबी याची आहे. धक्कादायक बाब म्हणजे कटात त्याचाही सहभाग होता. एनआयएच्या तपासानुसार, नबी हा कारच्या व्यवहारासाठी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत आला होता. डॉ. उमर उन नबी हा पंपोर जिल्ह्यातील संबूरा येथील रहिवासी आहे. त्याने हा संपूर्ण कट रचला होता. हैराण करणारे म्हणजे तो देखील डॉक्टर आहे.
तपास जसा जसा पुढे जात आहे, तशी या बॉम्बस्फोटाबद्दलही हैराण करणारी माहिती पुढे येतंय. ही गाडी अनेकदा विकण्यात आली आणि खरेदी करण्यात आली. शेवटी खोटी कागदपत्रे देऊन या गाडीचा व्यवहार झाला. ज्यादिवशी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, त्यावेळी ही i-20 कार दिल्लीत तब्बल 11 तासापासून फिरत होती. मोठी स्फोटके या कारमध्ये होती.