पिंपरी, ता. १७ ः शालेय जीवनापासून विविध खेळांमध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त आणि सहकार्यभावना वाढत असल्याचे मत मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज कॉलेजचे प्राचार्य डॉ.मनोज साठे यांनी व्यक्त केले. यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्याध्यापिका शारदा साबळे, निगडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जयदीप दळवी, हवालदार प्रकाश गरदरे, पर्यवेक्षक विजय पाचारणे, सदस्य राजीव कुटे, क्रीडा शिक्षक गंगाधर सोनवणे उपस्थित होते. डॉ. मनोज साठे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.