-rat१६p१९.jpg-
२५O०४७१४
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित नेट- सेट कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागींसोबत मान्यवर.
---
नेट- सेट कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा (नेट) आणि राज्य पात्रता चाचणी परीक्षा (सेट) यासाठी तयारी आणि सराव करण्यासाठी कलाशाखा आणि अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली.
यामध्ये तेजस कळंबटे आणि अपूर्वा राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत पदव्युत्तर स्तरावरील भाषा आणि सामाजिक शास्त्राचे ३० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. उच्च शिक्षणात अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असणारी नेट आणि सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पहिला पेपर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तेजस कळंबटे यांनी गणितीय कौशल्यांवर प्रकाश टाकला तर अपूर्वा राणे यांनी उच्च शिक्षण स्वरूप, संरचना आणि बदल यावर प्रकाश टाकला.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी कार्यशाळेची भूमिका विषद केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतील मार्गदर्शक तेजस कळंबटे व्यासपीठावर उपस्थित होते.