Sangli Politics: “भूलथापांना बळी पडू नका!” जयंत पाटीलांचा मतदारांना स्पष्ट सल्ला; आष्ट्यात स्वच्छ राजकारणाची हाक
esakal November 19, 2025 12:45 AM

आष्टा: ‘‘असभ्य, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात शहराची सत्ता द्यायची की सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांकडे, याचा मतदारांनी गंभीर विचार करावा,’’ असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले.

आष्टा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे व इतर उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, ‘‘दिवंगत विलासराव शिंदे यांनी शहराची फुलासारखी सेवा केली.

Wai Municipal Corporation: 'वाईत महायुतीतील मित्रपक्षांची वेगळी युती'; पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी, तिरंगी लढतीची शक्यता?

काहीजण कामापेक्षा जाहिरातबाजीवर भर देतात. निवडणुकीत आश्वासने देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवावी. गुन्हे अंगावर असलेले उमेदवार शहराचा विकास कसा करतील? तुमच्या मुलांना मटका शिकवायचा की, त्यांच्या हातात पेन द्यायचे, हे ठरवून

मतदान करा.’’

जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे म्हणाले, ‘‘आम्हाला गर्दीसाठी पैसे लावावे लागत नाहीत किंवा रडून मते मागावी लागत नाहीत. ंआष्टा शहरातील मतदार सुज्ञ, स्वच्छ प्रतिमेचे, शांत व गुन्हामुक्त उमेदवार विशाल शिंदे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावर सत्तेचा गैरवापर करून राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल.’’

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

उमेदवार विशाल शिंदे यांनीही शहरातील विकासकामांचा आढावा मांडत विरोधकांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. सभेला रत्नप्रभा शिंदे, दिलीपराव वग्याणी, झीनत अत्तार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.