मशाल व तुतारीची जुन्नरमध्ये आघाडी
esakal November 19, 2025 07:45 AM

जुन्नर, ता. १८ : जुन्नर नगर परिषदेची निवडणूक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रितपणे लढणार आहे. दोन्ही पक्षांकडून अधिकृत यादी प्रसिद्धीस देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगराध्यक्ष व नऊ सदस्यपदांसाठी; तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्यपदासाठी पाच व दोन पुरस्कृत जागा लढविणार आहे.
दोन्ही पक्षांचे उमेदवार पुढीलप्रमाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : गौरी शेटे- नगराध्यक्ष, संगीता मुंढे, चंद्रकांत डोके, रुपाली जाधव, संदीप ताजणे, शिवदर्शन खत्री, ज्योती पऱ्हाड, समीर भगत, रुपाली परदेशी, बाळासाहेब सदाकाळ. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : रवींद्र शिंदे, संदीप घोणे, सना शेख, मोनाली म्हस्के, मुबिन जमादार व प्रभाग दहा व चारमध्ये ॲड. सलमा सय्यद यांना पुरस्कृत केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.