ही घटना दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरात घडली आहे.
पीडित तरुणीची एका अन्सारी मुलाबरोबर मैत्री होती.
अन्सारी तुरुंगात गेल्यामुळे चार मुलींनी तरुणीला मारहाण करत तिच्या घरावर दगडफेक केली.
अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी
कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणींनी राडा घातलाय. मित्राशी बोलणं बंद केल्यानं आणि मित्र जेलमध्ये गेल्यानं मद्यधुंद मुलींनी एका मुलीच्या घरावर दगडफेक केलीय.या प्रकरणी पीडित मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केलीय. राडा घालणाऱ्या मुलींनी तरुणीला मारहाण देखील केली होती. घरावर दगडफेक करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Shocking News : १७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी निघाला सैन्यदलातील जवानमाझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय,असं म्हणत चार मुलींनी एका तरुणीच्या घरावर दगडफेक केलीय. ही घटना दोन दिवसापूर्वी नाशिकच्यासातपूर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची एका अन्सारी मुलाबरोबर मैत्री होती. मात्र त्यांची मैत्री तुटल्यानं त्या मुलीनं अन्सारीसोबत बोलणं बंद केलं. त्यानंतर अन्सारीने एका मैत्रिणीच्या माध्यमातून त्या तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या मुलीने आपल्या महाविद्यालयातील ओळखीच्या मुलांना याबाबत माहिती.
भेटायला बोलावून फिरायला नेलं, नंतर धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडलेत्या मुलांनी अन्सारीला जाब विचारत गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. याप्रकरणी अन्सारीला जेलमध्ये जावं लागलं. या कारणामुळे अन्सारीच्या मैत्रिणीने मनात राग ठेवून या मुलीला मारहाण केली. तिच्या घरावर दगडफेककरत शिवीगाळ केली. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. पीडित मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केलीय.