सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महादेव बिराजदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांचा खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यामध्ये प्रवेशकर्ते महादेव बिराजदार यांच्यासह चिदानंद शावळ, महादेव पुजारी, चंद्राम जनगोंडे, अजय बिराजदार, राहुल हिप्परगी, रविकांत बिराजदार, रविकांत डम्मे, सचिन करके, यल्लाप्पा हिप्परगे, नागेश तुळजापुरे, शाहीर निक्केवार आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी महादेव बिराजदार म्हणाले, आम्ही सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करू असे म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, मौलवी शेख, अकबर शेख, लखन चव्हाण उपस्थित होते.