Summary -
विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला
२२१ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
उमेदवारी ठरवताना गटबाजी आणि मनमानी झाल्याचा आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठं खिंडार पडलं
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विदर्भात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. नागपूरमध्ये २२१ पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरजिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून २२१ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. नगरपंचायत, नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप करत या सर्वांनी राजीनामे दिले असल्याची माहिती समोर आली आहे. वाडी पालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics: राज्यात शिवसेनेने खातं उघडलं, निवडणुकीपूर्वीच शिंदेचा उमेदवार झाला नगरसेवकनगरपालिका अध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील व्यक्तीला देताना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा हा अपमान आहे. याच कारणावरून २२१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले. या सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे प्रदेश अध्यक्षांकडे पाठविण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. हे सर्व पदाधिकारी नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची देखील चर्चा होऊ लागली आहे.
Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार; नाराज मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला|VIDEOकाँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रसन्ना तिडके यांनी सांगितले की, 'नाना पटोले यांचे समर्थक म्हणून काँग्रेसमध्ये त्रास देण्यात आला. तुमचे नेते असे तसे म्हणत बोलून दाखवण्यात आले. माझ्यावर काँग्रेसमध्ये अन्याय झाला.' काँग्रेसमधील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गटबाजी आणि नाराजी पुन्हा चर्चेत आली आहे. ग्रामीण भागात वर्चस्व असणारे सुनील केदार हे एक गट चालवत आहे. मौदा नगराध्यक्षपदाची उमेदवारीसाठी डावलण्यात आले. त्यामुळे अखेर बाहेर पडावे लागले, असा खळबळजनक आरोप प्रसन्ना तिडके यांनी केला आहे.
Maharashtra Politics: नात्यात राजकारण! कोकणात नगरपंतायतीत बाप-लेक आमनेसामने; कोण जिंकणार?दरम्यान, प्रसन्न तिडके यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेस टिकवण्यासाठी लढणारे प्रसन्न तिडके आता मौदात कमळ फुलवण्यात यशस्वी होतील का? याकडे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावर पूर्ण नियंत्रण असलेले माजी मंत्री आणि माजी आमदार सुनील केदार तसेच त्यांचे समर्थक खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर त्यांनी गटबाजीचे राजकारण केल्याबद्दल आरोप केला.
Maharashtra Political News : मावळ पॅटर्नला लोणावळ्यात ब्रेक! भाजपाचा स्वबळाचा निर्णय आणि राष्ट्रवादीचा डाव रंगणार का?