बाबर आझमला आयसीसीने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा दिली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत बाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने बॅट स्टंपवर आदळली.
त्यामुळे त्याला १० टक्के दंड आणि एक डिमिरीट पाँइंट मिळाला.
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम नुकताच फॉर्ममध्ये आला आहे, जवळपास दोन वर्षांनी त्याने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय शतक ठोकले होते. पण याच मालिकेतील तिसऱ्या वनडेत त्याच्याकडून एक चूक झाली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Videoरविवारी (१६ नोव्हेंबर) झालेल्या तिसऱ्या वनडेनंतर आयसीसीने बाबर आझमला सालमना शुल्काच्या १० टक्के दंड आणि एक डिमिरीट पाँइंट दिला आहे. त्याची चूक लेव्हल एकची असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार बाबर आझमकडून आचारसंहितेतील कलम २.२ चे उल्लंघन झाले आहे. हे कलम क्रिकेटच्या संबंधीत उपकरणे, कपडे, मैदानातील साधने किंवा वस्तूंचे नुकसान करण्याबाबतीत आहे. त्याने हा नियम मोडल्याने त्याच्यावर दंडाची आणि डिमिरीट पाँइंट्सची कारवाई झाली. ही गेल्या २४ महिन्यातील पहिली चूक होती.
नेमकं काय झालं होतं?तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने पाकिस्तानसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना २१ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जेफ्री वंडरसे याने बाबर आझमला त्रिफशळाचीत केले. त्याचा चेंडू खेळताना पुढे जाऊन खेळावे की मागेच थांबावे या गोंधळात असताना बाबर आझम बाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने बॅट स्टंपवर आदळली. त्यानंतर तो ड्रेसिंग रुमकडे परतला. बाबरने ५२ चेंडूत ३४ धावा केल्या आहेत.
या सामन्यात फखर जमाने ४५ चेंडूत ५५ धावांची खेळी केली, तर मोहम्मद रिझवनने ९२ चेंडूत नाबाद ६१ धावांची खेळी केली, तर हुसैन तलतने ५७ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानने ४४.४ षटकात ४ बाद २१५ धावा केल्या आणि सामना जिंकला.
IND A vs PAK A सामन्यात राडा! पाकिस्तानी खेळाडू बाऊंड्री लाईनवर कॅच होऊनही नाबाद, भारतीय संघाचा अंपायरसोबत वादतत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४५.२ षटकात सर्वबाद २११ धावा केल्या. श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमाने ४८ धावा केल्या, तर कर्णधार कुशल मेंडिसने ३४ धावांची आणि पवन रथनायकेने ३२ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वासिमने ३ विकेट्स घेतल्या.