Suraj Chavan : कोणाचं नशीब कधी पलटेल काहीही सांगता येत नाही.. असं काही बिग बॉस विनर सूरज चव्हाण याच्यासोबत झालं आहे. कधीकाळी पत्र्याच्या घरात राहणारा, पोटा भूक भागवण्यासाठी चांगलं अन्न नशिबात नसणारा सूरज चव्हाण आज आलिशान आयुष्य जगत आहे. बिग बॉसच्या घरात असताना चांगल्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सुरज चव्हाण याने बारामती याठिकाणी आलिशान घर बांधलं आणि आता सुरज बाशिंग बांधण्यासाठी देखील तयार झाला आहे. सध्या सर्वत्र सुरज याची चर्चा सुरु आहे.
पण एक काळ असा होता जेव्हा सूरज चव्हाण याच्याकडे घालायला चांगले कपडे देखील नव्हते… बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना सूरज याने दोन जोडी कपडे आणि तुटलेल्या कपड्यांसोबत प्रवेश केला होता.. सूरज याची परिस्थिती अत्यंत बेताची होती… पण परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
दोन जोडी कपडे आणि तुटलेल्या कपड्यांसोबत बिग बॉसमध्ये प्रवेश करणाऱ्या सूरज चव्हाण याला डिझाईनर सुमैया पठाण हिने आपल्या इच्छेने कपडे पाठवले होते… याबद्दल सूरजला काहीही माहिती नव्हतं. बिग बॉसच्या घरातील प्रवास देखील त्याच्यासाठी फार सोपा नव्हता…
प्रत्येक आठवड्यात सूरज याला नॉमिनेशन्सचा सामना करावा लागला… पण तो कायम सुरक्षित राहिला… अंतिम क्षण आला तेव्हा सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली… पण या शर्यतीत देखील विजय सूरज याचाच झाला आणि एका रात्रीत सूरज याचा नशीब चमकलं…
तेव्हा सर्वांनी सूरज याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. फक्त चाहते आणि सेलिब्रिटीच नाही तर, राजकारणी व्यक्तींनी देखील सूरज याचं कौतुक केलं… तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर सूरज याला घर बांधण्यासाठी मदत देखील केली.. ‘मी तुला घर बांधून देईन असं स्वत: अजित पवार यांनी त्याला म्हटलं आणि त्यांनी सूरज याला दिलेलं वचन देखील पूर्ण केलं आहे.
एवढंच नाही तर, अजित पवार यांनी स्वतः सूरज याच्या घराची पाहाणी देखील केली होती. अखेर सूरज याचं घर तयार झालेलं असून त्याने गृहप्रवेश देखील केला आहे. नव्या घराचे फोटो देखील सूरज याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रचंड आलिशान असं सूरज याचं घर आहे. ‘गुलीगत धोका’ म्हणत फेमस झालेल्या सूरज चव्हाणने आपल्या घरातील प्रत्येक कोपरा दाखवला आहे.
सूरज चव्हाण याचं लग्न…सूरज लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सूरज याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव संजना असं आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील समोर आली आहे. सूरज आणि संजना यांचा साखरपुडा, हळदी संमारंभ आणि लग्नसोहळा एकाच दिवशी होणार आहे. यांचा साखरपुडा, हळदी संमारंभ आणि लग्नसोहळा एकाच दिवशी होणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याचं लग्न सासवड, जेजुरी येथे पार पडणार आहे.