Oppo New Mobile : ओप्पोचा ब्रँड मोबाईल भारतात लॉन्च! पण Oppo Find X9 5G की OnePlus 15 5G..कोणता आहे बेस्ट? पाहा संपूर्ण Review
esakal November 20, 2025 09:45 AM

Mobile Review : भारतात नुकताच ओप्पोने आपला बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप स्मार्टफोन Find X9 5G लॉन्च केला आहे. हा फोन दमदार परफॉर्मन्स, अप्रतिम कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीमुळे चर्चेत आहे. पण याच किंमतीत वनप्लसनेही आपला OnePlus 15 5G बाजारात आणला असून दोन्ही फोन एकमेकांसमोर काट्याची टक्कर देत आहेत. चला तर मग या दोन्ही स्मार्टफोनचा रिव्यू पाहूया

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार डिझाइन आणि डिस्प्ले

दोन्ही फोन पाहताक्षणी एकसारखेच वाटतात. चौकोनी कॅमेरा मॉड्यूल, सपाट पॅनल आणि गोलाकार कडा, डिझाइन जवळपास सारखेच आहे. फक्त सेन्सर आणि फ्लॅशची जागा वेगळी आहे. दोघांनाही IP68 वॉटर रेझिस्टन्स मिळते, पण वनप्लस थोडं पुढे जाऊन IP69K रेटिंग देतो म्हणजे आणखी वॉटर प्रूफ. डिस्प्लेमध्ये मात्र फरक जाणवतो. ओप्पो फाइंड X9 मध्ये 6.59 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. तर वनप्लस 15 मध्ये मोठा 6.78 इंचाचा LTPO AMO

Fridge Hack : फ्रीजच्या आत पिवळा स्पंज का ठेवत आहेत भारतीय लोक? कारण जाणून तुम्हीही वापराल ही देशी ट्रिक परफॉर्मन्स आणि बॅटरी

स्पीडच्या बाबतीत ओप्पोने MediaTek Dimensity 9500 चिपसेट दिला आहे, तर वनप्लसने नवीन Snapdragon 8 Elite Gen 5 लावला आहे. दोन्ही 16GB रॅमपर्यंत उपलब्ध आहेत, पण स्नॅपड्रॅगनची चिप सध्या बाजारात सर्वात फास्ट मानली जाते. गेमिंग आणि हेवी कामात वनप्लस थोडंसं पुढे राहील असं दिसतंय. बॅटरीत मात्र ओप्पोने बाजी मारली आहे, तब्बल 7025 mAh. वनप्लस 15 मध्ये 7300 mAh आहे. चार्जिंगमध्ये वनप्लस पुढे, 120W फास्ट चार्जिंग, तर ओप्पोला 80W. म्हणजे वनप्लस फोन 20 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा कॅमेरा

दोघांनाही 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. वनप्लसला 3.5x ऑप्टिकल झूम मिळतो. पण ओप्पोने हॅसल्ब्लॅड ट्यून्ड लेन्स आणि नवीन LUMO इमेजिंग इंजिन दिल्याने रंग, डिटेल आणि लोलाइट फोटोमध्ये ओप्पो सरस ठरू शकतो. वनप्लसकडेही DetailMax इंजिन आहे, पण फोटो प्रेमींसाठी ओप्पोचा कॅमेरा जादू दाखवणार असं वाटतंय.

किंमत

ओप्पो फाइंड X9 5G (12GB + 256GB) 74999 रुपये (Oppo Find X9 5G Price), वनप्लस 15 5G (12GB + 256GB) 72999 रुपये (OnePlus 15 5G Price) .फक्त 2000 रुपयांचा फरक. जर तुम्हाला मोठा डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि रॉ पॉवर हवी असेल तर वनप्लस 15 निवडा. पण अप्रतिम कॅमेरा, दमदार बॅटरी आणि प्रीमियम फील हवा असेल तर ओप्पो फाइंड X9 तुमच्यासाठीच आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.